Join us   

भारतातल्या पारंपरिक सुंदर ७ काळ्या साड्या, संक्रांतीला एक तरी आपल्याकडे हवीच.. पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2024 10:47 AM

1 / 8
संक्रांतीचा सण म्हणजे काळ्या रंगाच्या साड्यांचे विशेष महत्त्व. एरवी वर्षभर आपण काळी साडी घेत नाही. पण संक्रांतीच्या निमित्ताने मात्र हमखास काळी साडी घेतलीच जाते. बघा या काही सुंदर रेशमी काळ्या साड्यांचे प्रकार...
2 / 8
काळ्या पैठणीला तर चंद्रकळा असं सुंदर नाव दिलेलं आहे. महाराष्ट्रीयन महिलांचं पैठणी प्रेम तर विचारायलाच नको. एरवी वेगवेगळ्या रंगाच्या पैठणी तर आपण घेतोच पण अशी एखादी चंद्रकळाही आपल्याकडे असावी...नाही का
3 / 8
कॉटन इरकल, सिल्क इरकल या साड्या खूप ट्रेण्डिंग आहे. यात काळा रंग घेतला आणि त्यावर ऑक्सिडाईज ज्वेलरी घातली तर नक्कीच चारचौघीत तुमची साडी उठून दिसेल.
4 / 8
प्लेन काळी नारायणपेठ आणि तिला असे गडद चमकदार रंगाचे काठ अशी साडीही खूप शोभून दिसते. नारायणपेठचे काठच मुळात चमकदार असल्याने काळ्या साडीला उठाव मिळतोच.
5 / 8
काळ्या रंगाची बनारसीही कधीतरी एखाद्या संक्रांतीला घेऊन पाहायला हरकत नाही.
6 / 8
कांजीवरम साडी वेगवेगळ्या रंगात आपण नेहमीच घेतो. आता या संक्रांतीला किंवा पुढच्या संक्रांतीला अशी एखादी काळी किंवा ग्रे रंगातली कांजीवरम घेऊन पाहा.
7 / 8
चंदेरी प्रकारातली एखादी हलकी- फुलकी काळी साडीही छान दिसते. तिच्यावरच्या दागिन्यांची रंगसंगती जमली की ती साडी खूप छान पार्टीवेअर लूकही देते.
8 / 8
गढवाल सिल्क प्रकारातल्या काळ्या साड्याही संक्रांतीच्या निमित्ताने बाजारात मोठ्या प्रमाणावर येतात. ते प्रकार एवढे सुंदर दिसतात की त्यातली एखादी काळी साडीही आपल्या कलेक्शनमध्ये असावीच असे वाटते.
टॅग्स : फॅशनमकर संक्रांतीसाडी नेसणे