नव्या नवरीसाठी बनारसी शालूचे सुंदर डिझाईन्स.. बघा पारंपरिक साड्यांचा अधुनिक साज, ६ आकर्षक रंग
Updated:December 6, 2025 13:38 IST2025-12-06T13:32:42+5:302025-12-06T13:38:35+5:30

लग्नसराईसाठी अनेक नवरी हौशीने बनारसी शालू घेतात. बनारसी साड्यांचा थाट नववधूचे सौंदर्य खुलवितो.. म्हणूनच लग्नानिमित्त शालू खरेदी करायचा असेल तर यंदा ट्रेण्डिंग असणारे शालूचे रंग आणि डिझाईन्स पाहा..
लाल रंगाचा शालू अनेक नववधूंची पहिली पसंती आहे. लाल रंग शुभ मानला जातो. त्यामुळे अनेकजणी हौशीने लाल रंगाचा शालू घेतात.
हिरवा रंगाचा शालूही अनेकींना खूप आवडतो आणि तो अंगावर छान उठून दिसतो...
गुलाबी रंगाच्या बनारसी शालूलाही खूप मागणी असून त्या छानशा रंगात नववधू आणखी आकर्षक दिसते..
जर थोडा वेगळा रंग हवा असेल तर अशा पद्धतीचा पर्पल रंंगही खूप छान वाटतो.
निळसर रंगाच्या बनारसी शालूलाही खूप मागणी असून तो देखील अतिशय वेगळा आणि चारचौघांत उठून दिसणारा वाटतो.