कॉटनच्या साडीचा नेसताना होतो बोंगा? ५ टिप्स- झटपट नेसा कॉटनची साडी चापूनचोपून

Updated:April 29, 2025 19:47 IST2025-04-29T19:42:14+5:302025-04-29T19:47:51+5:30

5 tips- Quickly and easily wear a cotton saree : कॉटनची साडी दिसते सुंदर मात्र सारखी वरवर चढते. ते थांबवण्यासाठी काही टिप्स पाहा.

कॉटनच्या साडीचा नेसताना होतो बोंगा? ५ टिप्स- झटपट नेसा कॉटनची साडी चापूनचोपून

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साडी नेसायचे म्हटल्यावर पहिल्यांदा डोक्यात कॉटनच्या साडीचाच विचार येतो. इतर पॅटर्नच्या साडींचा त्वचेला त्रास होतो. घामाने साडी अंगाला खाजते. मात्र कॉटनची साडी अगदी सुटसुटीत वाटते.

कॉटनच्या साडीचा नेसताना होतो बोंगा? ५ टिप्स- झटपट नेसा कॉटनची साडी चापूनचोपून

आजकाल कॉटनच्या साडीची फॅशन ट्रेंडमध्ये आहे. महिला फार आवडीने कॉटनची साडी नेसतात. साधी असली तरी फार सुंदर दिसते. सांभाळायलाही बरी पडते.

कॉटनच्या साडीचा नेसताना होतो बोंगा? ५ टिप्स- झटपट नेसा कॉटनची साडी चापूनचोपून

कॉटनची साडी नेसल्यावर वैताग एकाच गोष्टीचा येतो. कॉटनची साडी सारखी फुगते. वर-वर जाते. त्यामुळे दिसताना फार वाईट दिसते. साडी वर जाऊ नये तसेच फुगू नये यासाठी काही टिप्स पाहा आणि मग बिनधास्त कॉटनची साडी नेसा.

कॉटनच्या साडीचा नेसताना होतो बोंगा? ५ टिप्स- झटपट नेसा कॉटनची साडी चापूनचोपून

साडी फुगू नये यासाठी सगळ्यात मस्त उपाय म्हणजे साडीला स्टार्च लावणे. साडी व्यवस्थित बसण्यासाठी तसेच चांगली दिसावी यासाठी साडी धुऊन झाल्यावर स्टार्चच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची. नंतर फक्त पिळून घ्या. आणि कडक वाळवा.

कॉटनच्या साडीचा नेसताना होतो बोंगा? ५ टिप्स- झटपट नेसा कॉटनची साडी चापूनचोपून

साडी स्टीम प्रेस करायची. त्यामुळे साडी चांगली बसते. तसेच सुरकुत्या दिसत नाहीत. नीऱ्या तसेच पदर चांगला प्रेस करुन घ्यायचा. साडी चांगली बसते. सारखी उडणार नाही. हेअर स्ट्रेटनरचा वापरही करु शकता.

कॉटनच्या साडीचा नेसताना होतो बोंगा? ५ टिप्स- झटपट नेसा कॉटनची साडी चापूनचोपून

अनेक जणी साडीला बाहेरुन पिन लावतात. त्यामुळे साडी आणखी फुगते. त्यामुळे साडीच्या निऱ्यांना पिन लावताना पिन आतल्या बाजूने लावावी. निऱ्या छान घट्ट बसतात. साडी फुगत नाही.

कॉटनच्या साडीचा नेसताना होतो बोंगा? ५ टिप्स- झटपट नेसा कॉटनची साडी चापूनचोपून

साडीच्या आत परकर कोणता घालता याचाही विचार करा. आजकाल बॉडी शेपर मिळतात. बॉडीशेपरमुळे साडी अंगाला छान चापून-चोपून बसते. परकर सारखा पायात येतो. त्याचीही चिंता नाही.

कॉटनच्या साडीचा नेसताना होतो बोंगा? ५ टिप्स- झटपट नेसा कॉटनची साडी चापूनचोपून

सिलिकॉनचे स्टिकर्स मिळतात. त्यांचा वापर करुन साडी व परकर एकमेकांना चिकटवा. त्या स्टिकर्समुळे साडी खराब होत नाही. सिलिकॉनचे स्टिकर्स आरामात काढताही येतात. साडी छान अंगा लगत राहील.