त्वचा गोरी असो वा सावळी, प्रत्येक महिलेच्या कपाटात 'हे' ५ रंग असायलाच हवे , सौंदर्य येईल खुलून..
Updated:December 21, 2025 17:01 IST2025-12-21T16:59:16+5:302025-12-21T17:01:41+5:30
Colors for all skin tones: Best colors for every skin tone: Colors that suit fair and dark skin: कोणत्याही त्वचेवर मॅच होणारे ५ खास रंग पाहूया जे फॅशन ट्रेंडमधून कधीच ऑफ ट्रेंड होत नाहीत.

खरेदीला गेल्यानंतर आपण मोठ्या पेचात सापडतो. रंग आवडतो तर कपडे आवडत नाही. कपडे आवडले तर हवी तशी फिटिंग बसत नाही. त्यात हा रंग आपल्याला सूट होईल का असा प्रश्न देखील अनेकांना पडतो. आपली त्वचा गोरी, सावळी, गहूवर्णी किंवा गडद असली तरी काही रंग असे असतात जे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खुलून दिसतात. (Colors for all skin tones)
योग्य रंग निवडला तर ते फक्त आपल्या त्वचेवर तेज वाढवत नाही तर आपला आत्मविश्वास देखील वाढवते.कोणत्याही त्वचेवर मॅच होणारे ५ खास रंग पाहूया जे फॅशन ट्रेंडमधून कधीच ऑफ ट्रेंड होत नाहीत. (Best colors for every skin tone)
नेव्ही ब्लू हा रंग अत्यंत एलिगंट आणि क्लासी मानला जातो. गोऱ्या किंवा सौम्य त्वचेवर, सावळ्या किंवा गडद त्वचेवर हा रंग उठून दिसतो. ऑफिसवेअर असो, साडी असो किंवा पार्टी ड्रेस नेव्ही ब्लू प्रत्येक वेळी योग्य ठरतो.
मॅरून हा रंग लाल आणि तपकिरी यांचा सुंदर मिलाफ असलेला जो प्रत्येकाला शोभून दिसतो. मॅरून रंग गडद असला तरी तो त्वचेचा टोन दाबत नाही. आपल्या व्यक्तिमत्त्वाला राजेशाही लूक देतो. सण, लग्नसमारंभ किंवा खास प्रसंगांसाठी मॅरून रंगाची साडी किंवा ड्रेस नेहमीच चांगली दिसते.
एमराल्ड ग्रीन हा रंग रंग निसर्गाशी जोडलेला असल्यामुळे कायम त्वचेवर तेज देतो. गडद आणि समृद्ध रंग असल्याने गोऱ्या ते गडद सर्व त्वचेवर छान खुलतो. या रंगात चेहरा फ्रेश दिसतो आणि डोळ्यांचं सौंदर्यही अधिक उठून दिसतं.
अनेकांना वाटतं की पिवळा रंग सर्वांवर शोभत नाही, पण मस्टर्ड शेड अपवाद आहे. हा रंग फार चमकदार नसल्यामुळे तो त्वचेला सौम्य कॉन्ट्रास्ट देतो. गहूवर्णी, सावळ्या त्वचेवर मस्टर्ड यलो सूट करतो. तर गोऱ्या त्वचेवर तो वेगळाच चार्म निर्माण करतो.
चारकोल ग्रे हा रंग काळ्या रंगासारखाच हा रंग क्लासिक आहे. हा रंग कोणत्याही व्यक्तीला स्मार्ट लूक देतो. ऑफिस, कॅज्युअल किंवा फॉर्मल सगळ्या ठिकाणी हा रंग उठून दिसतो.