साड्या कपाटात ठेवताना करता ३ चुका, म्हणून जर काळी पडते-पाहा खास टिप्स...

Updated:July 1, 2025 17:56 IST2025-07-01T17:35:53+5:302025-07-01T17:56:24+5:30

3 common mistakes that can silently ruin your favourite sarees and how to avoid them : Sari Mistakes Every Woman Must Avoid : How to Store Sarees Safely for Long-Term Use : भरजरी, महागड्या साड्या कपाटात स्टोअर करताना अजिबात करु नका 'या' ३ चुका...

साड्या कपाटात ठेवताना करता ३ चुका, म्हणून जर काळी पडते-पाहा खास टिप्स...

साडी म्हणजे प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा विषय. आपल्या वॉर्डरोबमध्ये प्रत्येक प्रकारच्या आणि (3 common mistakes that can silently ruin your favourite sarees and how to avoid them) पॅटर्नच्या साड्या असाव्यात अशी प्रत्येकीची इच्छा असते. आपल्यापैकी प्रत्येकीकडे ठेवणीतल्या, भरजरी, महागड्या साड्या असतातच. या साड्या आपण फारशा वापरत नाहीत. लग्नसमारंभ, सण किंवा खास प्रसंगी नेसून झाल्यावर या साड्या अनेकदा कपाटात वर्षानुवर्षे तशाच ठेवलेल्या असतात.

साड्या कपाटात ठेवताना करता ३ चुका, म्हणून जर काळी पडते-पाहा खास टिप्स...

काहीवेळा कपाटात ठेवलेल्या साड्यांची योग्य काळजी न घेतल्यास (How to Store Sarees Safely for Long-Term Use) त्या खराब होतात. अनेकदा या साड्यांवर डाग, बुरशी, कीड, किंवा कसर लागून घडीजवळ फाटण्याची शक्यता असते.

साड्या कपाटात ठेवताना करता ३ चुका, म्हणून जर काळी पडते-पाहा खास टिप्स...

यासाठीच, या किमती साड्या दीर्घकाळ चांगल्या टिकून राहाव्यात यासाठी योग्य पद्धतीने कपाटात स्टोअर करुन ठेवणे अत्यंत गरजेचे असते. तुमच्या सुंदर भरजरी साड्या खराब होऊ नयेत, यासाठी त्या कपाटात ठेवताना कोणत्या ३ चुका करु नयेत ते पाहा...

साड्या कपाटात ठेवताना करता ३ चुका, म्हणून जर काळी पडते-पाहा खास टिप्स...

काहीजणी साड्यांच्या घड्यांमध्ये नेफ्थलीनच्या गोळ्या घालून त्या कपाटात ठेवतात. नेफ्थलीनच्या गोळ्या वापरल्याने कीड दूर राहील असं वाटतं, पण या गोळ्या साड्यांचे नुकसान करू शकतात. त्याऐवजी आपण लवंग काड्या आणि कापूर वड्यांचा वापर करु शकतो. हा सुरक्षित आणि प्रभावी कीटकनाशक पर्याय आहे, जो साड्या टिकवून ठेवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. साड्यांच्या कपाटात ४ ते ५ लवंग काड्या किंवा कापूर वड्या ठेवल्यास कीड आणि दुर्गंधी दूर राहते.

साड्या कपाटात ठेवताना करता ३ चुका, म्हणून जर काळी पडते-पाहा खास टिप्स...

प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये साड्या ठेवल्यास साड्यांमध्ये ओलावा जमा होऊन राहतो, ज्यामुळे साड्यांचा रंग फिका होऊ शकतो आणि कापड खराब होण्याची शक्यता असते. त्याऐवजी साड्या स्वच्छ व शुद्ध सुती कपड्यात गुंडाळा किंवा हवा खेळती राहील अशा कॉटनच्या साडी बॅगमध्ये भरुन ठेवा. यामुळे साड्या सुरक्षित राहून वर्षानुवर्षे चांगल्या टिकून राहतात.

साड्या कपाटात ठेवताना करता ३ चुका, म्हणून जर काळी पडते-पाहा खास टिप्स...

साड्या बराच काळ एकाच पद्धतीची घडी घालून ठेवल्यास त्या घड्यांच्या जागचे कापड कमजोर होऊन फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे साड्या उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी दर ३ ते ६ महिन्यांनी त्यांच्या घड्या बदलण्याची गरज असते. यामुळे साड्या दीर्घकाळ टिकतील आणि सुंदर राहतील.