जुन्या काठाच्या साडीचे शिवा आकर्षक गाऊन ड्रेसस; १० नवीन अनारकली पॅटर्न पाहा, सुंदर दिसाल
Updated:September 8, 2025 16:26 IST2025-09-08T15:55:42+5:302025-09-08T16:26:55+5:30
10 Ideas To Make Dresses From Old Sarees : यावर फुल स्लिव्हज, बलून स्लिव्हज किंवा हाफ स्लिव्हजचं पॅटर्न शिवू शकता.

प्रत्येकाच्याच कपाटात आईच्या किंवा आजीच्या जुन्या साड्या असतात. या साड्यांपासून तुम्ही नवनवीन स्टाईल्सचे गाऊन्स, ड्रेसेस शिवू शकता. साड्यांच्या गाऊन्सचे नवीन, स्टायलिश प्रकार पाहूया. (Make Anarkali Dresses From Old Silk Saree)
अनारकली स्टाईलमध्ये परसट गाऊन शिवून तुम्ही त्यावर फुल स्लिव्हज, बलून स्लिव्हज किंवा हाफ स्लिव्हजचं पॅटर्न शिवू शकता. (10 Ideas To Make Dresses From Old Sarees)
लग्नकार्यासाठी किंवा खास प्रसंगांसाठी लेस किंवा खड्यांचे वर्क असलेले गाऊन्स छान दिसतील.
जर साडीचा रंग कॉन्ट्रास्ट असेल तर तुम्ही या पॅटर्न्सचे ब्लाऊज शिवू शकता. मागचा भाग बंद न ठेवात हूक्स किंवा चेन लावून घ्या.
शर्टवर घालता येईल साडीचा स्कर्टसुद्धा शिवून घेऊ शकता. त्याच साडीचा वापर करून तुम्हाला दुपट्टा बनवून घेता येईल.
जर तुम्हाला सिंपल लूक हवा असेल तर फुल स्लिव्हज आणि स्वेअर नेकसह हे घेर असलेले पॅटर्न शिवू शकता.
मागे नॉट्स लावून तुम्ही जाळीदार गळा ठेवू शकता किंवा गोंडे लावू शकता.
साडीपासून ड्रेस शिवण्यासाठी तुम्हाला पॅटर्ननुसार शिलाई लागेल. सिंपल पॅटर्न असेल तर ५०० रूपयांपासून ते हेवी वर्क असेल तर २००० पर्यंत खर्च येईल.
कॉटनची साडी असेल तर तुम्ही त्याचे असे गाऊन्स शिवू शकता. हाताला पफ स्लिव्हजचे पॅटर्न्स छान दिसतील.
फ्रिलचे पॅटर्नसुद्धा उठून दिसतील. साड्याच्या रंगात किंवा कॉन्स्ट्रास्ट रंगात लेस लावू शकता.