सनराइजर्स हैदराबादची सीईओ काव्या मारन का आहे चर्चेत? सर्वात जबरदस्त टिमची श्रीमंत मालकीण..
Updated:March 29, 2025 14:49 IST2025-03-29T14:25:51+5:302025-03-29T14:49:30+5:30
Why is Sunrisers Hyderabad CEO Kavya Maran in the news? The richest owner of the most powerful team : काव्या मारन हे नाव सध्या सारखे कानावर पडत आहे. पाहा कोण आहे काव्या.

सध्या सगळीकडे आयपीलची हवा आहे. फक्त खेळाडूच नाही तर सगळ्या संघांचे मालकसुद्धा फार चर्चेत आहेत. मग संघ कोणताही असो आयपीलची धुंदी प्रेक्षकांवर फार जास्त चढलेली दिसते आहे.
सनराईझरर्स हैदराबाद म्हणजेच एसआरएच हा आयपीएलमध्ये खेळणाऱ्या संघांपैकी एक संघ आहे. एसआरएचचा सामना चालू असताना संघाची सीईओ फार उत्साहात संघाला प्रोत्साहन देताना दिसते.
काव्याचा जन्म ६ ऑगस्ट १९९२ ला चेन्नई या ठिकाणी झाला. तिच्या घरातील प्रत्येक व्यक्ती मोठा उद्योगपती आहे.
काव्या मारन ही एका उद्योगपती घराण्यातील महिला आहे. ती कलनिधी मारन यांची मुलगी आहे. उद्योग क्षेत्रातील मारन परिवार फार मोठे नाव आहे.
काव्या मारन ही एक उत्तम बिझनेस वुमन म्हणून ओळखली जाते. चेन्नईच्या स्टेला मारिस कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले. नंतर तिने अमेरिकेतून एमबीए केले आहे.
संघासाठी निर्णय घेणे, गुंतवणूक करणे, पब्लिसीटी करणे इतरही कामे ती करते. इतरही अनेक काम काव्या मारनच्या आदेशानेच घडतात.
काव्याचे वडील तर श्रीमंत आहेतच मात्र काव्याकडे ४०९ करोड एवढी नेट वर्थ आहे. तिची संघातील ओनरशीप मात्र गुप्तच ठेवण्यात आली आहे.
सध्या आयपीएलमध्ये काव्याची चर्चा जोरदार आहे. काव्या दिसायलाही फार सुंदर आहे. तसेच संघातील खेळाडूंबरोबर तिचे नातेही खेळीमेळीचे आहे.