Join us   

तब्बू, सिर्फ नाम ही काफी है! वाचा तब्बूविषयी फारशा माहितीच नसलेल्या 8 गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2022 1:08 PM

1 / 8
१. जमाल अली हाशमी आणि रिझवाना यांची लेक म्हणजे अभिनेत्री तब्बू. आज सगळं जग तिला तब्बू नावाने ओळखत असलं तरी तबस्सूम फातिमा हाशमी हे तिचं मुळ नाव. आपल्या सहज अभिनयाने आणि सुंदर व्यक्तिमत्त्वाने तब्बूने फिल्म जगतात तिची स्वत:ची वेगळी जागा निर्माण केली आहे, यात वादच नाही.
2 / 8
२. 'चांदनी बार', 'हैदर', 'लाईफ ऑफ ए पाय', अशा वेगवेगळ्या चित्रपटांमधून अभिनयाचे विविध पैलू दाखविणाऱ्या तब्बूच्या करिअरची सुरुवात बालवयातच झाली. वयाच्या १० व्या वर्षी तिने 'बाजार' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर वयाच्या १४ व्या वर्षी तिने देव आनंद यांच्यासोबत 'हम नौजवान' या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. कुली नं. १ या तेलगू चित्रपटातून अभिनेत्री म्हणून तिला पहिला ब्रेक मिळाला.
3 / 8
३. बोनी कपूर यांच्या 'प्रेम' या चित्रपटात तब्बूने अभिनेता संजय कपूर याच्यासोबत काम केले. हा चित्रपट पूर्ण व्हायला तब्बल ८ वर्षे लागली. याच दरम्यान तब्बू आणि संजय एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण लवकरच त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर साजिद नाडियादवाला, नागार्जून यांच्यासोबतही तिचं सिरियस अफेअर झालं. पण लग्नापर्यंत हा प्रवास होऊ न शकल्याने तब्बू अजूनही सिंगल आहे.
4 / 8
४. तब्बूची एक खासियत म्हणजे ती पुर्णपणे शाकाहारी आहे. तिच्या घरी तिची आई खूप उत्तम बिर्याणी बनवायची. अनेकांना ती खूप आवडायची. पण तब्बूने मात्र शाकाहारी असल्याने कधीही त्या बिर्याणीची चव घेतली नाही.
5 / 8
५. आपलं काम भलं आणि आपण भलं... असा थोडासा तब्बूचा स्वभाव. त्यामुळे बी टाऊनमध्ये होणाऱ्या पार्ट्यांमध्ये ती कधीच रमत नाही.
6 / 8
६. तब्बूचे केस म्हणजे तिच्यासाठी जीव की प्राण आहेत. त्यावर वेगवेगळे प्रयोग करायला किंवा केस कापायला तिला अजिबात आवडत नाही. त्यामुळे भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी तब्बूच्या हेअरस्टाईलमध्ये खूपच कमी बदल दिसून येतो.
7 / 8
७. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची भाची असलेली तब्बू तिच्या मित्रमंडळींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये टॅब्स, टब्स, तब्बी अशा वेगवेगळ्या निकनेमने ओळखली जाते.
8 / 8
८. अभिनेता अजय देवगण आणि तब्बू यांच्या मैत्रीबाबत नेहमीच बोललं जातं. दोघंही अगदी शाळकरी वयापासून एकमेकांचे चांगले मित्र- मैत्रिण आहेत. आणि अजूनही त्यांची मैत्री टिकून आहे.
टॅग्स : सेलिब्रिटीतब्बू