Smita Patil : एका फोटोने बदललं नशीब, निवेदिका ते अभिनेत्री - स्मिता अकाली गेली, प्रेमात अपयशी ठरली..पण..

Updated:December 14, 2025 11:37 IST2025-12-14T11:34:48+5:302025-12-14T11:37:58+5:30

Smita Patil death anniversary: Smita Patil biography: Smita Patil journey: एका फोटोने स्मिता पाटील यांच संपूर्ण आयुष्य बदललं.

Smita Patil : एका फोटोने बदललं नशीब, निवेदिका ते अभिनेत्री - स्मिता अकाली गेली, प्रेमात अपयशी ठरली..पण..

भारतीय चित्रपटसृष्टीत काही चेहरे असे असतात जे सौंदर्यामुळे नाही तर आपल्या अभिनयामुळे कायम प्रेक्षकांच्या मनात राहतात. त्यातीलच एक स्मिता पाटील. बोलके डोळे, रेखीव चेहरा आणि अभिनयाचं खणखणीत नाणं. नायिका न बनता ती खऱ्या अर्थाने अभिनेत्री म्हणून पडदा गाजवत होती. (One Take Queen Smita Patil)

Smita Patil : एका फोटोने बदललं नशीब, निवेदिका ते अभिनेत्री - स्मिता अकाली गेली, प्रेमात अपयशी ठरली..पण..

आजही त्यांच्या अभिनयाची चर्चा होते, त्यांच्या चित्रपटांचा अभ्यास केला जातो आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरतं.(Smita Patil Bollywood actress)

Smita Patil : एका फोटोने बदललं नशीब, निवेदिका ते अभिनेत्री - स्मिता अकाली गेली, प्रेमात अपयशी ठरली..पण..

स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ साली मुंबईत झाला. मराठी माध्यमातून शिकल्या आणि पुढे मुंबईच्या दूरदर्शनसाठी निवेदिका म्हणून समोर आल्या. त्यांच्या मधुर आवाजामुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे भरपूर लोकप्रियता मिळाली.

Smita Patil : एका फोटोने बदललं नशीब, निवेदिका ते अभिनेत्री - स्मिता अकाली गेली, प्रेमात अपयशी ठरली..पण..

स्मिता पाटील यांचा प्रवास कोणत्याही झगमगाटातून सुरू झालेला नव्हता. त्या सुरुवातीला दूरदर्शनवर एक निवेदिका म्हणून काम करत होत्या. साधा पेहराव, गंभीर चेहरा आणि आवाजात आत्मविश्वास हेच त्यांचं वैशिष्ट्य.

Smita Patil : एका फोटोने बदललं नशीब, निवेदिका ते अभिनेत्री - स्मिता अकाली गेली, प्रेमात अपयशी ठरली..पण..

नशीब कधी कोणतं वळण घेईल सांगता येत नाही. स्मिता पाटीलच्या आयुष्यातही असंच काहीस घडलं. एका फोटोने त्यांच संपूर्ण आयुष्य बदललं.रस्त्यावर पडलेल्या फोटोवर त्यावेळचे दूरदर्शनचे डायरेक्टर, पी.व्ही. कृष्णमूर्ती यांची नजर त्यावर पडली. सहज सौंदर्य, आत्मविश्वास आणि गंभीर भाव पाहून दिग्दर्शनकांचं लक्ष वेधलं गेलं आणि त्यांना अभिनयाच्या जगात पदार्पण करावं लागलं.

Smita Patil : एका फोटोने बदललं नशीब, निवेदिका ते अभिनेत्री - स्मिता अकाली गेली, प्रेमात अपयशी ठरली..पण..

त्यांनी बांगलादेशचे राष्ट्रगीत “अमर शोनार बांगला” गायले. ज्यामुळे त्यांना न्यूज अँकर म्हणून निवडले. समांतर चित्रपटातून स्मिताने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. अर्थ, मंझिल, भविश्य, आणि आरक्षण अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली.

Smita Patil : एका फोटोने बदललं नशीब, निवेदिका ते अभिनेत्री - स्मिता अकाली गेली, प्रेमात अपयशी ठरली..पण..

स्मिता पाटील यांनी राज बब्बर यांच्याशी लग्न केलं. 13 डिसेंबर 1986 साली त्यांनी वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा प्रवास जरी कमी आयुष्याचा असला, तरी तो अत्यंत प्रभावी होता.

Smita Patil : एका फोटोने बदललं नशीब, निवेदिका ते अभिनेत्री - स्मिता अकाली गेली, प्रेमात अपयशी ठरली..पण..

आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आठवताना असं जाणवतं की स्मिता पाटील केवळ अभिनेत्री नव्हत्या, तर त्या भारतीय सिनेमात स्त्री-अभिनयाची व्याख्या बदलणारा एक काळ होत्या.