सोनम कपूरच्या बाळाचं सुरेख बेडरूम, नातवासाठी आजीने करून घेतलं खास डिझाईन, फोटो व्हायरल
Updated:November 15, 2022 16:06 IST2022-11-15T15:59:14+5:302022-11-15T16:06:59+5:30

१. अभिनेत्री सोनम कपूर हिने काही महिन्यांपुर्वीच मुलाला जन्म दिला. त्यामुळे कपूर आणि अहुजा कुटूंबिय आनंदात असून त्यांनी दणक्यात बाळाचं स्वागतही केलं होतं.
२. आता नुकतेच सोनमने तिचा मुलगा वायू याच्या बेडरुमचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत आणि हे बेडरुम इतकं आकर्षक करण्यासाठी तिला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे विशेष आभार मानले आहेत.
३. हे बेडरूम सोनम कपूर आणि तिची आई सुनीता कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्याचं सोनमच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून दिसून येतं.
४. बेडरूमच्या इंटेरियरसाठी वूडन आणि पांढरा असे दोन मुख्य रंग वापरण्यात आले आहेत.
५. अगदी मोजकं सामान आणि मोजकी पण अतिशय आकर्षक खेळणी ठेवून ते अतिशय सुरेख पद्धतीने डेकोरेट केलंय.
६. बेडरूममधलं रंगकाम अनेकांना आवडलं आहे. सामान्यपणे बाळासाठी गडद रंग निवडले जातात. पण सोनमने मात्र राखाडी आणि अगदी फिकट आकाशी असे दोन रंग वापरून ते सजवलं आहे.
७. छोट्याशा २ खिडक्या पण त्यातून येणारा लख्ख, स्वच्छ सुर्यप्रकाश बेडरूम अधिक फ्रेश बनवतो.
८. होणाऱ्या बाळासाठी कशा पद्धतीचं इंटेरिअर करून घ्यायचं, असा विचार करत असाल तर यातल्या आपल्या बजेटमध्ये बसू शकणाऱ्या काही आयडिया तुम्ही नक्कीच वापरू शकता.