बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
Updated:December 26, 2025 16:49 IST2025-12-26T16:35:08+5:302025-12-26T16:49:55+5:30
केस गळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. कोरडं हवामान आणि प्रदूषणाचा थेट परिणाम आपल्या केसांवर होतो.

हिवाळा सुरू झाला असून थंडी वाढत आहे. अशा परिस्थितीत आपल्या आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांचीही विशेष काळजी घेणं अत्यंक आवश्यक आहे. थंड हवेचा स्काल्पवर खूप वाईट परिणाम होतो.
डँड्रफची समस्या देखील अचानक वेगाने वाढू लागते, ज्यामुळे अनेकदा आपल्याला चारचौघात लाजिरवाणं वाटतं. या ऋतूमध्ये केस गळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. कोरडं हवामान आणि प्रदूषणाचा थेट परिणाम आपल्या केसांवर होतो.
लोक या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय करतात, पण त्याचा परिणाम खूपच कमी जाणवतो. जर तुम्हालाही या समस्येपासून लवकर सुटका हवी असेल, तर तुम्ही काही चुका करणं टाळलं पाहिजे.
गरम पाण्याने केस धुणं
काही लोक हिवाळ्यात आपले केस गरम पाण्याने धुतात, ही चूक तुम्ही करू नका. ही वाईट सवय तुमच्या केसांचं नुकसान करू शकते.
गरम पाण्यामुळे स्काल्पची त्वचा कोरडी पडते आणि केस कमकुवत होऊन तुटू लागतात, खूप गळतात.
हेअर स्टाईलिंग टूल्सचा वापर
हिवाळ्यात केसांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं, अन्यथा अनेक समस्या केसांना निर्माण होतात. बहुतेक मुली हेअर ड्रायर किंवा स्ट्रेटनरचा वापर करतात.
ज्यामुळे केसांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. या उपकरणांमधील उष्णता केसांमधील ओलावा काढून घेते आणि केसांना कमकुवत बनवतं.
मालिश न करणं
तुम्ही तुमच्या केसांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. स्काल्पला तेलाने मालिश न केल्यामुळे हिवाळ्यात केस कमकुवत होतात आणि गळू लागतात.
केसांच्या मुळांपर्यंत पोषक तत्वे पोहोचवण्यासाठी मालिश करणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे डोक्याला देखील आराम मिळतो.
डिहायड्रेशन
हिवाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवते. याचा परिणाम तुमच्या केसांवरही दिसून येतो.
केसांना डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखणं गरजेचं आहे. त्यासाठी पुरेसं पाणी प्या. केसांची नीट काळजी घ्या.