केसांना डाय किंवा मेहेंदीची कधी गरजच पडणार नाही, मोहरीचं तेल 'असं' लावा- केस नॅचरली काळे होतील
Updated:February 9, 2026 15:05 IST2026-02-09T14:58:42+5:302026-02-09T15:05:38+5:30

केस कमी वयातच पांढरे व्हायला लागले असतील तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय लगेचच करा... (home hack for natural black hair)
हा उपाय करण्यासाठी एका लोखंडी कढईमध्ये २ चमचे मोहरीचं तेल घ्या. मोहरीचं तेल उष्ण असलं तरी केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं.(use of sarso oil for naturally black hair)
या तेलामध्ये २ चमचे हळद घाला. हळदीचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने केस रंगविले जाऊ शकतात.(how to get rid of white hair or gray hair?)
आता या मिश्रणामध्ये १ चमचा कॉफी पावडर घाला. कॉफीमुळे तुमच्या केसांना नॅचरल रंग आणि चमक येण्यास मदत होते. हे तिन्ही पदार्थ ७ ते ८ मिनिटे गरम होऊ द्या. गरम होत असताना ते वारंवार हलवत राहा. यानंतर मिश्रण काळसर रंगाचं झालं की गॅस बंद करा.(home made hair colour for black hair)
आता या लेपामध्ये व्हिटॅमिन ई ची १ कॅप्सूल घाला. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होऊन त्यांच्यावर चमक येण्यास मदत होईल.
जर तुमच्या डोक्यात कोंडा असेल तर अर्धा चमचा लिंबाचा रसही यात घाला.
हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळाशी, तसेच पांढऱ्या केसांवर लावा. यानंतर पाऊण तासाने माईल्ड शाम्पू वापरून केस धुवून टाका.
हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास केस नॅचरली काळे होऊ लागतील. शिवाय डोक्यातला कोंडाही कमी होईल. केसांवर छान चमक येऊन त्यांची वाढही चांगली होईल.