३० दिवसांत केस गळती कमी करणारा उपाय-केसांवर शिंपडा ‘हे’ पिवळं पाणी-केस वाढतीलही लांबसडक
Updated:January 28, 2026 18:29 IST2026-01-28T12:07:01+5:302026-01-28T18:29:58+5:30

केस गळण्याचे प्रमाण खूप वाढले असेल किंवा केस अजिबातच वाढत नसतील तर पुढे सांगितलेला एक खास उपाय लगेचच करून पाहा..(how to get rid of hair fall?)
हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही घरगुती पदार्थच वापरायचे आहेत. आणि आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करायचा आहे. जर तुम्ही काही दिवस हा उपाय नियमितपणे केला तर अगदी एखाद्या महिन्यातच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये खूप छान परिणाम दिसून येईल.(simple home hacks to reduce hair fall)
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी २ चमचे मेथी दाणे घ्या आणि ते ८ ते १० तास ग्लासभर पाण्यात भिजत ठेवा. असे केल्यामुळे मेथी दाण्यांमधील कित्येक पौष्टिक घटक पाण्यामध्ये पुर्णपणे मिसळतात.(use of fenugreek seeds for reducing hair fall)
त्यानंतर हे पाणी गॅसवर गरम करायला ठेवा आणि ७ ते ८ मिनिटे मंद आचेवर चांगले उकळवून घ्या. यानंतर हे पाणी थंड होऊ द्या आणि मग गाळून एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.
यानंतर आठवड्यातून दोन वेळा रात्री झोपण्यापुर्वी हे पाणी केसांच्या मुळाशी मारा आणि हळुवारपणे केसांना मालिश करा. दुसऱ्यादिवशी केस नाही धुतले तरी चालते.
काही दिवस हा उपाय करून पाहा. केसांमध्ये खूप छान बदल दिसून येईल. केसांचं गळणं कमी होईल.