केसांना लावा टोमॅटो हेअर मास्क! डोक्यातला कोंडा कमी होऊन केस होतील मुलायम, सिल्की
Updated:May 6, 2025 18:07 IST2025-05-06T18:01:26+5:302025-05-06T18:07:09+5:30

बहुतांश लोकांची ही समस्या असते की डोक्यातला कोंडा काही केल्या कमी होत नाही.
केसांमध्ये कोंडा असेल तर आपोआपच केसांना चांगले पोषण मिळत नाही आणि त्यामुळे ते जास्त गळतात. म्हणूनच आता एक टोमॅटो घेऊन हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा (benefits of tomato hair mask). कोंडा तर कमी होईलच, पण त्यासोबतच केसांना इतरही अनेक फायदे होतील.(tomato hair mask for removing dandruff)
केसांसाठी टोमॅटो हेअरमास्क करायचा असेल तर सगळ्यात आधी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घ्या आणि त्याची अगदी बारीक पेस्ट किंवा प्युरी करून घ्या.
यानंतर टोमॅटोच्या पेस्टमध्ये १ चमचा दही घाला. दह्यामुळेही डोक्यातला कोंडा कमी होतो तसेच केसांवर चांगली चमक येते.
यानंतर त्यामध्ये थोडासा मध आणि लिंबाचा रस घाला. मधामुळे डोक्याची त्वचा नैसर्गिक पद्धतीने हायड्रेटेड होण्यास मदत होते.
आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा आणि ती केसांच्या मुळाशी लावा.
त्यानंतर साधारण अर्ध्या तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.
हा उपाय नियमितपणे केल्यास डोक्यातील कोंडा तर कमी होईलच, पण केस छान चमकदार, मुलायम आणि सिल्की होतील.(home hacks for smooth, shiny hair)