सणउत्सवाचे दिवस आणि मेकअप प्रॉडक्ट्स सुकून खडखडीत झाले? ८ टिप्स- एका मिनिटांत वापरा तेच नव्यासारखे...
Updated:August 28, 2025 17:03 IST2025-08-28T16:46:55+5:302025-08-28T17:03:03+5:30
tips & tricks how to fix dry makeup products at home : how to fix dry makeup products : makeup hacks for dry products : revive old makeup at home : makeup products repair hacks : beauty hacks for dried cosmetics : home remedies for dry makeup : सुकलेले मेकअप प्रॉडक्ट्स, पुन्हा पहिल्यासारखे करुन वापरात येतील यासाठी काही सोप्या आणि स्मार्ट ट्रिक्स...

सणवार किंवा खास प्रसंग असला की आपण आवर्जून मेकअप करतो. आपल्यापैकी बऱ्याचजणी रोज मेकअप न करता फक्त खास प्रसंगी (tips & tricks how to fix dry makeup products at home) किंवा सणावारालाचा मेकअप करतात. यामुळे मेकअप किटमधील मेकअप प्रॉडक्ट्सचा वापर दररोज होत नसल्याने अनेकदा ते सुकून कोरडे पडतात. काहीवेळा तर अक्षरशः हे प्रॉडक्ट्स इतके सुकून खडबडीत होतात की ते चक्क फेकून द्यावे लागतात.
मस्कारा, फाउंडेशन, लिक्विड लिपस्टिक किंवा नेलपॉलिशसारखे (beauty hacks for dried cosmetics) महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स काही काळानंतर सुकतात. यामुळे अनेकदा ते वापरणे कठीण होते आणि आपल्याला ते फेकून द्यावे लागतात.
असे होऊ नये यासाठी, सुकलेले मेकअप प्रॉडक्ट्स, पुन्हा पहिल्यासारखे करुन वापरात येतील यासाठी काही सोप्या आणि स्मार्ट ट्रिक्स पाहूयात.
१. मस्कारा :-
मस्कारा हा सर्वात लवकर सुकणारा मेकअप प्रॉडक्ट आहे. जर तुमचा मस्कारा सुकून घट्ट झाला असेल आणि ब्रशवर व्यवस्थित लागत नसेल, तर त्यात डोळ्याचे ड्रॉप्स (Eye Drops) किंवा गुलाब पाण्याचे काही थेंब टाका. ब्रशने ते चांगले मिसळा आणि झाकण घट्ट बंद करा. काही वेळानंतर मस्कारा पुन्हा मऊ होईल आणि वापरण्यायोग्य बनेल.
२. फाउंडेशन :-
लिक्विड फाउंडेशन जास्त काळ बंद राहिल्यास घट्ट आणि कोरडे होते. अशा वेळी ते फेकून देण्याऐवजी, त्यात मॉइश्चरायझर किंवा कोरफड जेलचे (Aloe Vera Gel) काही थेंब मिसळा. यामुळे फाउंडेशन पुन्हा गुळगुळीत होईल आणि चेहऱ्यावर नैसर्गिक फिनिशिंग देईल.
३. नेलपॉलिश :-
नेलपॉलिश सुकणे ही एक फारच कॉमन समस्या आहे. जर तुमची नेलपॉलिश फारच कोरडी झाली असेल, तर त्यात नेलपॉलिश रिमूव्हरचे काही थेंब टाका आणि बाटली चांगली हलवा. पण, लक्षात ठेवा की रिमूव्हर जास्त टाकू नका, नाहीतर नेलपॉलिशचा रंग फिका होऊ शकतो.
४. लिक्विड लिपस्टिक :-
मॅट लिक्विड लिपस्टिक लवकर सुकते. ती पुन्हा वापरण्यासाठी, त्यात लिप बाम किंवा खोबरेल तेलाचे काही थेंब घाला. यामुळे लिपस्टिक पुन्हा क्रिमी होईल आणि ओठांना लावल्यावर नैसर्गिक ओलावा देखील देण्यास फायदेशीर ठरेल.
५. पावडर प्रॉडक्ट्स :-
काहीवेळा कॉम्पॅक्ट पावडर, ब्लश किंवा आयशॅडो तुटतात आणि वापरण्यायोग्य राहत नाहीत. त्यांना पुन्हा वापरण्यायोग्य बनवण्यासाठी, पावडर पूर्णपणे बारीक करून त्यात रबिंग अल्कोहोलचे काही थेंब टाका. आता ते दाबून पुन्हा त्याच डब्यांत भरा, काही वेळ सुकू द्या. कॉम्पॅक्ट पावडर, ब्लश किंवा आयशॅडो पुन्हा पहिल्यासारखे वापरता येतील.
६. जेल आयलायनर :-
जर जेल आयलायनर सुकायला लागले, तर त्यात ग्लिसरीनचा किंवा मेकअप सेटिंग स्प्रेचा एक थेंब टाकून चांगले मिसळा. यामुळे त्याची सुकलेली कंन्सिसटन्सी पुन्हा नॉर्मल होईल.
७. लिप बाम :-
जर तुमचा लिप बाम खूप घट्ट झाला असेल, तर त्याला थोडीशी उष्णता द्या किंवा त्याची डबी काही वेळ गरम पाण्यात ठेवा. यामुळे लिप बाम पुन्हा मऊ होईल आणि सहज वापरता येईल.
८. नेहमी मेकअप प्रॉडक्ट्सचे झाकण घट्ट बंद करा. त्यांना थेट सूर्यप्रकाश किंवा गरम किंवा फार उष्णता असणाऱ्या जागेवर ठेवू नका.