केस वाढत नाहीत? साऊथ इंडियन तरुणींचा सिक्रेट फॉर्म्युला वापरा; ५ घरगुती हेअर मास्क, फाटे फुटलेले केस गायब
Updated:December 30, 2025 20:00 IST2025-12-30T20:00:00+5:302025-12-30T20:00:02+5:30
hair growth tips: South Indian hair care secrets : homemade hair masks: काही घरगुती हेअर मास्क केसांना लावल्यास फाटे फुटलेल्या केसांपासून आपली सुटका होईल.

आपल्यापैकी अनेकांना केसांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केसांना फाटे फुटणे, कोरडेपणा आणि केसांची वाढ थांबल्यासारखी वाटणे ही लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात. बदललेली जीवनशैली, वाढलेला ताणतणाव, अपुरी झोप, चुकीचा आहार, सततचे केमिकल ट्रीटमेंट्स आणि प्रदूषण यांचा थेट परिणाम केसांच्या मुळांवर होताना दिसतो. परिणामी केस कमकुवत होतात, टोकांना फाटे पडतात आणि केसांची नैसर्गिक वाढ मंदावते.(split ends treatment)
केसांची खुंटलेली वाढ थांबवण्यासाठी आपण महागडे ट्रीटमेंट्स, शाम्पू, सीरमचा वापर करतो. पण यामुळेही केसांना नुकसान होते. अशावेळी काही घरगुती हेअर मास्क केसांना लावल्यास फाटे फुटलेल्या केसांपासून आपली सुटका होईल. (homemade hair masks)
नारळाच्या तेलात कढीपत्ता मिसळून लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात. ज्यामुळे केसांना टोक फुटत नाही. या तेलामुळे टाळूवरील जळजळ कमी होऊ शकते आणि कोंड्यापासून आराम मिळतो.
ऑलिव्ह ऑइलमध्ये केळी मॅश करुन केसांना लावा. ३० मिनिटानंतर केस पूर्णपणे स्वच्छ करा. नंतर शाम्पूने केस धुवा. यामुळे केस मॉइश्चरायझ होण्यास मदत होईल आणि केसांची वाढ होईल.
कांद्याचा रस आणि मेथी दाण्याचा हेअर पॅक केसांसाठी फायदेशीर आहे. यात अँटीऑक्सिडंट्स, प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते. मेथीच्या बिया केसातील कोरडेपणा कमी करतो. हे करण्यासाठी मेथीचे दाणे पाण्यात भिजवा आणि त्याची पेस्ट तयार करा. यात कांद्याचा रस मिसळून केसांना लावा. ज्यामुळे केसांची मुळे घट्ट होतील.
केसगळती कमी करण्यासाठी दह्यामध्ये बेसन मिसळा. यामुळे केस मजबूत होऊन केस गळती रोखता येते. दह्यामध्ये २ चमचे बेसन मिसळून केसांना लावा. यामुळे केसांना फाटे कमी फुटतील. हा हेअर पॅक केसांना २ ते ३ वेळा लावा.
तांदळाचे पाणी आणि कोरफडीचा गर केसांना योग्य पोषण देते. केस धुण्यापूर्वी ३० मिनिटे तांदळाचे पाणी आणि कोरफडीचा गर एकत्र करुन स्प्रे बाटलीत भरा. आणि केसांना हे पाणी लावून बोटांनी मसाज करा. यामुळे केस तुटणे कमी होईल.