केस धुतांना नेहमीच्या शाम्पूत ‘हा’ पदार्थ घाला, केसांचं गळणं गायब-केसांवर येईल चमक-होतील सुळसुळीत
Updated:November 15, 2025 15:28 IST2025-11-15T13:18:36+5:302025-11-15T15:28:51+5:30

केस खूप गळायला लागले असतील आणि केसांवरची चमक कमी झाली असेल तर महिनाभर हा एक उपाय नियमितपणे करून पाहा.
हा उपाय केल्यामुळे केसांची वाढ जास्त चांगली होईल. तसेच केसांची मुळं पक्की होऊन केस गळण्याचं प्रमाणही कमी होईल.
हा उपाय करण्यासाठी अर्धा चमचा जवस घ्या. जवस केसांवर चमक आणतात आणि केस कोरडे, सिल्की होण्यास मदत करतात.
त्यानंतर अर्धा चमचा मेथी दाणे घ्या. केसांची मुळं पक्की होण्यासाठी मेथी दाणे उपयुक्त ठरतात.
आता यामध्येच अर्धा चमचा कलौंजी आणि ८ ते १० कडिपत्त्याची पाने घ्या. हे सगळे पदार्थ अर्धा ग्लास पाण्यात गरम करायला ठेवा.
पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये रोजमेरी घाला. रोजमेरी नसेल तरी चालेल.
आता हे पाणी ५ ते ७ मिनिटे उकळून घेतल्यानंतर गाळून घ्या. त्यानंतर ते तुमच्या नेहमीच्या शाम्पूमध्ये घाला आणि या पाण्याने केस धुवा.
हा उपाय आठवड्यातून एकदा करा. महिना भरातच केसांमध्ये खूप चांगला परिणाम दिसून येईल.