Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी: लव्हस्टोरी, परफेक्ट कपल ते पॉर्न अ‍ॅप

Published:July 20, 2021 07:04 PM2021-07-20T19:04:15+5:302021-07-20T19:53:24+5:30

Raj Kundra arrest : नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळतो.

Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी: लव्हस्टोरी, परफेक्ट कपल ते पॉर्न अ‍ॅप

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती बिजनेसमन राज कुंद्रा इंडस्ट्रीचा सगळ्यात प्रसिद्ध आणि चर्चेच असणारं जोडपं आहे. या दोघांची जोडी फॅन्सना प्रचंड आवडते. शिल्पा आणि राज नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर वेगवेगळे व्हिडीओज आणि फोटोज शेअर करत असतात.

Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी: लव्हस्टोरी, परफेक्ट कपल ते पॉर्न अ‍ॅप

अश्लील चित्रपट बनवण्याच्या व प्रसारित करण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला सोमवारी अटक केली. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिल्पा आणि राज तुफान चर्चेत आले आहेत. या दोघांची पहिली भेट कधी झाली? त्यांच्यातील जवळीक कशी वाढली? याबाबत अनेक गोष्टी चर्चेत आहेत.

Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी: लव्हस्टोरी, परफेक्ट कपल ते पॉर्न अ‍ॅप

शिल्पा शेट्टीची राज कुंद्रासह भेट झाली तेव्हा तिचं नाव इंडस्ट्रीमध्ये खूप उंचावर पोहोचलं होतं. सुपरहीट स्टार्ससह ती काम करत होती. २००७ मध्ये युके बेस्ड रिएलिटी शो 'बिग ब्रदर' च्या सिजन ५ मध्ये तिनं सहभाग घेतला होता.

Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी: लव्हस्टोरी, परफेक्ट कपल ते पॉर्न अ‍ॅप

विवादित शो 'बिग ब्रदर' ची ती विजेती बनली. याच दरम्यान तिची भेट लंडनमध्ये विवाहित बिझनेसमॅन राज कुंद्रासह झाली. राज शिल्पा शेट्टीच्या नावाच्या परफ्यूमचे प्रमोशन करण्यासाठी तिची मदत करत होता.

Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी: लव्हस्टोरी, परफेक्ट कपल ते पॉर्न अ‍ॅप

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची भेट हळू हळू मैत्री आणि नंतर प्रेमात बदलू लागली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. रिपोर्ट्नुसार रिलेशनशिपच्या सुरूवातीलाच राज शिल्पाला अनेक महागड्या गिफ्ट्स द्यायचा.

Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी: लव्हस्टोरी, परफेक्ट कपल ते पॉर्न अ‍ॅप

यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 22 नोव्हेंबर 2009 रोजी शिल्पाने राज कुंद्राशी लग्न केले. दोघांचेही पारंपारिक रीतिरिवाजांसह त्याच्या खास मित्र आणि कुटूंबाच्या उपस्थितीत लग्न झाले.

Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी: लव्हस्टोरी, परफेक्ट कपल ते पॉर्न अ‍ॅप

सुंदर दिसण्यासाठी फिट राहण्यासाठी शिल्पा खूप मेहनत घेते हे तर जगजाहीर आहे. योगाभ्यास आणि वर्कआऊटचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या या व्हिडीओपासून अनेकांना वर्कआऊटची प्रेरणा मिळाली असेल आणि तेही फिटनेसबाबत सजग झाले असतील.

Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी: लव्हस्टोरी, परफेक्ट कपल ते पॉर्न अ‍ॅप

फोटोत अगदी करिअरच्या सुरुवातीला दिसणारी शिल्पा आणि आत्ताची शिल्पा दोन्ही फरक पाहायला मिळत आहे. पूर्वीचा फोटो पाहून अनेकांना विश्वासच बसणार नाही. इतका सामान्य तिचा लूक होता. जुन्या फोटोंमध्ये आणि आत्ताच्या फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी: लव्हस्टोरी, परफेक्ट कपल ते पॉर्न अ‍ॅप

नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळतो.

Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी: लव्हस्टोरी, परफेक्ट कपल ते पॉर्न अ‍ॅप

सोशल मीडियावरील शिल्पाचे नवीन अवताराताली फोटो तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरत असतात.

Raj Kundra : राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी: लव्हस्टोरी, परफेक्ट कपल ते पॉर्न अ‍ॅप

इन्स्टाग्राम अकाउंटवर तुम्ही नजर टाकली असता तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटोंना खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्याचे पाहायला मिळते. (Image Credit- Social media, instagram)