Join us   

जान्हवी कपूरचे डोळे पाहिले, सुंदर! तिच्याकडून शिका आय मेकअप, पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 7:01 PM

1 / 9
जान्हवी कपूरचे विथ मेकअप, विदाउट मेकअप लूकचे फोटो सतत व्हायरल होत राहातात. ती कोणत्याही लूकमधे असली तरी बघणार्‍याचे आधी लक्ष वेधतात ते तिचे सुंदर , मोठे डोळे. जान्हवीच्या सौंदर्याचं गुपित हे तिच्या डोळ्यात लपलेलं आहे. मेकअपची चाहती असलेली जान्हवी डोळ्यांच्या मेकअपकडे जरा जास्तच लक्ष देते. इतकंच नाही तर कोणत्यावेळी कोणता आय मेकअप चांगला दिसेल, आयमेकअपमधले परफेक्ट कॉम्बिनेशन याबाबतचे बारकावेही तिला माहिती आहेत. आय मेकअपबाबत जाणकार असलेली जान्हवी कपूर डोळे सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांच्या मेकअपच्या टिप्सही शेअर करते. या टिप्स तरुण मुलींसोबतच महिलांच्याही उपयोगाच्या आहेत.
2 / 9
डे मेकापसाठी जान्हवी ब्राऊन आयशॅडो वापरण्याचा सल्ला देते. ती म्हणत यामुळे डोळ्यांच्या सौंदर्याला छान डेप्थ ( खोली) मिळते.
3 / 9
डोळे विशेष आकर्षक दिसावेत असं वाटत असेल तेव्हा डोळ्यांमधे काजळ भरताना ते जरा जास्त भरावं. जान्हवी म्हणते ज्यांचे डोळे मोठे आहे त्यांनी यापध्दतीने काजळ लावावं. यामुळे मोठे डोळे आणखी छान दिसतात. पण ज्यांचे डोळे छोटे आहेत त्यांनी डोळ्यात गच्च काजळ भरण्याचं टाळावं.
4 / 9
जान्हवी म्हणते सणावाराला मेकअप करताना डोळ्यांसाठी स्मोकी आय मेकअपला प्राधान्य द्यावं. स्मोकी आय मेकअपमुळे डोळे उठून दिसतात, ते छान मोठे दिसून आपल्या सौंदर्यात भर घालतात. आयलायनर, आयशॅडो आणि काजळ यांचा विशेष वापर या प्रकारच्या मेकअपमधे केलेला असतो.
5 / 9
साधा मेकअप असेल तर डोळ्यांचा न्यूड आय मेकअप करावा. न्यूड मेकअपमधे पापण्यांना दाट मस्कारा वापरला जातो. जान्हवी म्हणते ‘न्यूड आय मेकअप विथ थिक मस्कारा कोट’ मुळे डोळे सुंदर , उठावदार आणि ग्लॅमरस दिसतात.
6 / 9
संध्याकाळच्या मेकअपसाठी डोळ्यांची मोहकता वाढावी म्हणून जान्हवी पापण्यांवर ग्लिटर्स आणि ब्लॅक आयलायनरची जोड देण्याचा सल्ला देते.
7 / 9
सकाळच्या वेळेस आय मेकअप करतान जान्हवी चमकदार आयलायनर वापरण्याचा सल्ला देते. ती म्हणते यामुळे डोळे पाणीदार आणि ताजेतवाने दिसतात.
8 / 9
डोळ्यांचा मेकअप करताना चांगल्या प्रतीचे चमकदार हायलायटर डोळ्यांच्या आतल्या कडांना लावावेत असं जान्हवी सांगते. .
9 / 9
डोळ्यांचा मेकअप करताना जान्हवी भुवयांकडेही लक्ष द्यायला लावते. भुवयांना हात न लावता डोळ्यांचा मेकअप पूर्ण होऊच शकत नाही असं जान्हवीचं स्पष्ट मत आहे. भुवया छान उठून दिसतील, चमकतील तेव्हाच डोळ्यांचा मेकअपही उठून दिसेल. भुवया आकर्षक दिसण्यासाठी भुवयांना पोमेड ( चिकट द्रव घटक ज्यामुळे केस चमकतात) आणि व्हॉयला ( आयब्रो फिलर पावडर) यांचा वापर करायला लावते. या दोन गोष्टींमुळे भुवया छान लांब,उठावदार आणि चमकदार दिसतात.