केसांना रात्रभर तेल लावून ठेवत असाल तर 'हे' वाचाच- डॉक्टर सांगतात केसांसाठी ५ महत्त्वाच्या गोष्टी

Updated:March 27, 2025 16:11 IST2025-03-27T16:01:40+5:302025-03-27T16:11:00+5:30

केसांना रात्रभर तेल लावून ठेवत असाल तर 'हे' वाचाच- डॉक्टर सांगतात केसांसाठी ५ महत्त्वाच्या गोष्टी

बऱ्याच जणींना केसांना रात्रभर तेल लावून ठेवण्याची सवय असते. रात्री तेल लावून डोक्याला मालिश करायची आणि सकाळी केस धुवायचे, असं चित्र बऱ्याच घरांमध्ये दिसून येतं.(Is It Good to Leave Hair Oils in Overnight?)

केसांना रात्रभर तेल लावून ठेवत असाल तर 'हे' वाचाच- डॉक्टर सांगतात केसांसाठी ५ महत्त्वाच्या गोष्टी

पण डॉक्टर असं सांगत आहेत की ही सवय अतिशय चुकीची आहे. मग तेल लावण्याची योग्य पद्धत काेणती, केसांना तेल किती वेळ लावून ठेवावं (how long should we leave oil in hair) आणि केसांची चांगली वाढ होण्यासाठी तसेच केस अकाली पांढरे होऊ नये म्हणून काय उपाय करावे, याविषयीची वैद्य परिक्षित शेवडे यांनी दिलेली माहिती bolbala.podcast या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.(5 important hair care tips by expert)

केसांना रात्रभर तेल लावून ठेवत असाल तर 'हे' वाचाच- डॉक्टर सांगतात केसांसाठी ५ महत्त्वाच्या गोष्टी

यामध्ये ते सांगत आहेत की नहाण्याच्या म्हणजेच केस धुण्याच्या अवघ्या १० मिनिटे आधी केसांना तेल लावावं आणि लगेच केस धुवून टाकावे. कारण केस लावून ठेवल्याने डोक्याच्या त्वचेला ऑक्सिजन मिळणं बंद होतं आणि त्यामुळे मग डोक्यात कोंडा होण्याचं प्रमाण वाढतं.

केसांना रात्रभर तेल लावून ठेवत असाल तर 'हे' वाचाच- डॉक्टर सांगतात केसांसाठी ५ महत्त्वाच्या गोष्टी

याशिवाय आहारातून हिरवी मिरची खाण्याचं प्रमाण खूप कमी करावं. कारण केसांच्या वाढीसाठी ते योग्य नाही.

केसांना रात्रभर तेल लावून ठेवत असाल तर 'हे' वाचाच- डॉक्टर सांगतात केसांसाठी ५ महत्त्वाच्या गोष्टी

जंकफूड आपल्या आहारातून पुर्णपणे हद्दपार केले तरी चालतील. कारण त्यातून शरीरात जाणारे घटक केसांसाठी अजिबात चांगले नाहीत.

केसांना रात्रभर तेल लावून ठेवत असाल तर 'हे' वाचाच- डॉक्टर सांगतात केसांसाठी ५ महत्त्वाच्या गोष्टी

केसांची चांगली वाढ होण्यासाठी आणि केस अकाली पांढरे होऊ नये म्हणून हंगामी फळं आपल्या आहारात असायलाच हवी. फळं खाण्याची योग्य वेळ सकाळची असून ज्यावेळी चांगली भूक लागलेली असते अशावेळीच फळं खाण्यास प्राधान्य द्यावं, असं डॉक्टर सांगतात.

केसांना रात्रभर तेल लावून ठेवत असाल तर 'हे' वाचाच- डॉक्टर सांगतात केसांसाठी ५ महत्त्वाच्या गोष्टी

आवळा केसांसाठी अतिशय उत्तम आहे. त्यामुळे जेव्हा आवळ्याचे दिवस असतात तेव्हा रोज १ आवळा तरी हमखास खायलाच हवा.

केसांना रात्रभर तेल लावून ठेवत असाल तर 'हे' वाचाच- डॉक्टर सांगतात केसांसाठी ५ महत्त्वाच्या गोष्टी

याशिवाय केसांना तेल लावताना तेलामध्ये चिमूटभर हळद टाकून लावल्यास अधिक चांगले. या काही गोष्टी नियमितपणे करून पाहा. केसांमध्ये खूप चांगला फरक दिसून येईल.