दह्यात ५ पदार्थ कालवून लावा, केसातील कोंड्यापासून होईल कायमची सुटका, केस होतील चमकदार मऊ

Updated:April 13, 2025 16:32 IST2025-04-13T16:27:01+5:302025-04-13T16:32:25+5:30

Curd for dandruff: Hair care tips with curd: How to use curd for dandruff and hair fall: Best ingredients to mix with curd for hair care: काही घरगुती पदार्थांचा वापर केला तर केसातील कोंडा कमी होण्यास मदत होईल.

दह्यात ५ पदार्थ कालवून लावा, केसातील कोंड्यापासून होईल कायमची सुटका, केस होतील चमकदार मऊ

उन्हाळ्यात आपल्याला सगळ्यात जास्त घाम येतो. घामामुळे आपले केस ओले राहातात. ज्यामुळे केसात कोंड्याची समस्या निर्माण होते. (Natural hair pack for dandruff using curd)

दह्यात ५ पदार्थ कालवून लावा, केसातील कोंड्यापासून होईल कायमची सुटका, केस होतील चमकदार मऊ

केसातील कोंडा घालवण्यासाठी आपण अनेक महागडे शाम्पू वापरतो. परंतु, केसातील कोंडा काही जात नाही. काही घरगुती पदार्थांचा वापर केला तर केसातील कोंडा कमी होण्यास मदत होईल. तसेच केस शायनी आणि मुलायम होतील. (How to use curd for dandruff and hair fall)

दह्यात ५ पदार्थ कालवून लावा, केसातील कोंड्यापासून होईल कायमची सुटका, केस होतील चमकदार मऊ

वाटीभर दह्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून केसांना आणि टाळूला लावा. अर्धा तास केस तसेच राहू द्या. आठवड्यातून दोनदा असे केल्याने केसातील कोंडा नाहीसा होण्यास मदत होईल. (Hair care tips with curd)

दह्यात ५ पदार्थ कालवून लावा, केसातील कोंड्यापासून होईल कायमची सुटका, केस होतील चमकदार मऊ

कोंडा दूर करण्यासाठी आपण कोरफड जेल देखील लावू शकतो. यासाठी एका भांड्यात दही घेऊन त्यात ३ ते ४ चमचे कोरफडीचा गर मिसळवा. ३० ते ३५ मिनिटे तसेच ठेवून केस धुवा. हा पॅक आपण आठवड्यातून दोनदा वापरु शकतो.

दह्यात ५ पदार्थ कालवून लावा, केसातील कोंड्यापासून होईल कायमची सुटका, केस होतील चमकदार मऊ

अनेकजण दही आणि अंडी केसांना लावतात. जर आपल्या डोक्यात कोंडा असेल तर हे फायदेशीर आहे. अर्धी वाटी दह्यात एक अंडे नीट फेटून घ्या. टाळूला लावून ४० मिनिटे ठेवा, नंतर केस शाम्पूने धुवा.

दह्यात ५ पदार्थ कालवून लावा, केसातील कोंड्यापासून होईल कायमची सुटका, केस होतील चमकदार मऊ

एका भांड्यात २ ते ३ चमचे बेसन दह्यात कालवून केसांना आणि टाळूला लावा. अर्ध्या तासानंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवा. हे आपल्या टाळूतील अतिरिक्त तेल शोषून घेते.

दह्यात ५ पदार्थ कालवून लावा, केसातील कोंड्यापासून होईल कायमची सुटका, केस होतील चमकदार मऊ

केसातील कोंडा घालवण्यासाठी आपण फक्त दही देखील वापरु शकतो. यासाठी वाटीभर दही टाळूवर लावा. अर्धा तास तसेच राहू द्या. त्यानंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवा. कोंडा आणि केसात सुटणाऱ्या खाजेपासून सुटका होईल.