नारळाच्या तेलात मिसळा स्वयंपाकघरातील १ गोष्ट, असरदार उपाय- केसांची वाढ होईल दुपटीने, गळणंही थांबेल
Updated:August 31, 2025 17:08 IST2025-08-31T17:05:56+5:302025-08-31T17:08:59+5:30
Coconut oil for hair growth: Hair fall home remedies: Natural hair growth tips:केसगळतीच्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर हा सोपा उपाय करुन पाहा.

ऋतू बदलला की, केसगळतीची समस्या अधिक प्रमाणात वाढू लागते. केसांच गळणं, विरळ होणं आणि केसांच्या वाढीवर याचा परिणाम होऊ लागतो. पावसाळ्यात केसगळतीची समस्या खूप वाढते. केस कमकुवत होऊन केस तुटतात. (Coconut oil for hair growth)
केसांच्या या समस्यांना आपल्याला देखील सामोरे जावे लागत असेल तर नारळाच्या तेलात कांद्याचा रस मिसळल्यास फायदा होईल. हे तेल केसांना कसे लावावे पाहूया. (Hair fall home remedies)
कांद्यामध्ये सल्फर आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. जे केसांना निरोगी आणि मजबूत करतात. यामुळे केसगळतीची समस्या कमी होते.
१ कांदा चिरुन त्याची पेस्ट तयार करा. १०० मिली नारळाच्या तेलात मिसळून चांगले उकळवा. कांदा आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण लाल होईपर्यंत उकळवा. तेल चांगले शिजल्यानंतर थंड होऊ द्या.
कांदा आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण थंड झाल्यानंतर गाळून एका भांड्यात ठेवा. नंतर तेलाने डोक्याला मसाज करा.
हे तेल केसांना १ ते २ तास लावा आणि नंतर शाम्पूने केस धुवा. ज्यामुळे केसगळतीसह इतर समस्या कमी होतील.
नारळाचे तेल केसांसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. ते केसांना कोरडे होण्यापासून रोखते.