मेहेंदी लावल्याने केस खूप ड्राय होतात? 'या' पद्धतीने मेहेंदी भिजवा, केस होतील सिल्की- मुलायम
Updated:May 24, 2025 16:28 IST2025-05-24T16:20:29+5:302025-05-24T16:28:30+5:30

पांढरे केस लपविण्यासाठी अनेक जण केसांना मेहेंदी लावतात. कारण केस रंगविण्याचा तो एक जुना आणि हर्बल उपाय आहे.(how to reduce dryness of hair after applying mehendi or heena?)
हल्ली बाजारात वेगवेगळे हेअर कलर किंवा हेअर डाय मिळतात. पण त्यामध्ये केमिकल्स असल्याने अनेकांना ते लावणे आवडत नाही आणि ते मेहेंदीचा पर्याय निवडतात.(best method of applying heena to hair for getting smooth shiny hair)
पण मेहेंदीमुळे केस कोरडे होतात. त्यांचा कोरडेपणा वाढल्याने ते अगदीच झाडूसारखे रुक्ष होतात. शिवाय केस कोरडे असतील तर त्यांना फाटेही फुटतात असा अनेकांचा अनुभव आहे.
म्हणूनच मेहेंदीमुळे केसांना कोरडेपणा येऊ नये यासाठी काय उपाय करावा याविषयीची माहिती dr.priyanka.abhinav_7509 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी मेहेंदी भिजविण्याची एक खास पद्धत सांगितली आहे.
यानुसार एका पातेल्यामध्ये १ ग्लास बीटरुटचा ज्यूस घ्या आणि तो गॅसवर गरम करायला ठेवा.
बीटरुटच्या ज्यूसमध्ये १ चमचा कॉफी पावडर टाका. कॉफी पावडरमुळे केसांना लाल रंग न येता डार्क ब्राऊन रंग येतो.
आता यामध्ये १ चमचा मेथी दाण्यांची पावडर आणि जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या थोड्याशा क्रश करून घाला.
आता या चारही पदार्थांचा अर्क एकमेकांमध्ये मिसळेपर्यंत पाणी गरम होऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा. हे पाणी गाळून घ्या आणि त्यामध्ये मेहेंदी भिजवा.
आता या पद्धतीने भिजवलेली मेहेंदी जर तुम्ही केसांना लावली तर केसांना रंग तर छान येईलच पण ते अजिबात कोरडे होणार नाहीत. उलट केसांना छान पोषण मिळून ते मऊ होतील.