मंगळागौर, राखीपौर्णिमेच्या फंक्शनला सर्वात खास दिसायचं तर लक्षात ठेवा ७ टिप्स... दिसा स्पेशल

Published:August 3, 2022 03:35 PM2022-08-03T15:35:42+5:302022-08-03T15:40:42+5:30

How To Make Rakhi Purnima and Festival look, 7 tips to Keep in Mind Makeup Tips: सणावाराला सगळ्यांमध्ये दिसा उठून, तयार होण्यासाठी सोप्या टिप्स...

मंगळागौर, राखीपौर्णिमेच्या फंक्शनला सर्वात खास दिसायचं तर लक्षात ठेवा ७ टिप्स... दिसा स्पेशल

सणवार म्हटले की पारंपरिक कपडे आणि नटणे ओघानेच आले. श्रावण महिन्यात तर श्रावणी सोमवार, शुक्रवार, सत्यनारायण, मंगळागौर अशा अनेक निमित्ताने आपल्याला छान आवरावे लागते (Makeup Tips). अशावेळी नेमका कसा लूक करायचा असा प्रश्न पडला असेल तर त्यासाठीच काही खास टिप्स (How To Make Rakhi Purnima and Festival look, 7 tips to Keep in Mind) ...

मंगळागौर, राखीपौर्णिमेच्या फंक्शनला सर्वात खास दिसायचं तर लक्षात ठेवा ७ टिप्स... दिसा स्पेशल

घरच्या घरी एखादी पूजा किंवा व्रत असेल तर फार हेवी साडी नेसायची गरज नाही. अशावेळी थोडी साधी, वजनाला हलकी अशी काठापदराशी छानशी साडी आणि साधासा मेकअप केला तरी आपण सुंदर दिसू शकतो. छानसा एखादा ज्वेलरी सेट आणि नेहमीची हेअरस्टाइलही आपल्याला मस्त लूक देऊ शकते.

मंगळागौर, राखीपौर्णिमेच्या फंक्शनला सर्वात खास दिसायचं तर लक्षात ठेवा ७ टिप्स... दिसा स्पेशल

पण आपल्याकडे सत्यनारायण पूजा किंवा आणखी कोणते व्रत असेल आणि पाहुणे येणार असतील तर मात्र आपण छान सजायला हवे. अशावेळी सोन्याच्या दागिन्यांबरोबरच पैंजण, जोडवी, नथ, वाकी असे पारंपरिक दागिने घातल्यास आपला लूक खुलण्यास नक्कीच मदत होते.

मंगळागौर, राखीपौर्णिमेच्या फंक्शनला सर्वात खास दिसायचं तर लक्षात ठेवा ७ टिप्स... दिसा स्पेशल

मंगळागौर म्हटलं की साधारणपणे हल्ली नऊवारी साडी नेसली जाते. यावर ठुशी, नथ, नथीचे मंगळसूत्र, नथीचे कानातले, कोल्हापुरी साज असे पारंपरिक दागिने अतिशय खुलून दिसतात. अशावेळी हातात एक बांगडी घालण्यापेक्षा मॅचिंग भरपूर बांगड्या घातल्या तरी हात छान दिसतो. नऊवारीवर आंबाडा, बन हे छान दिसते.

मंगळागौर, राखीपौर्णिमेच्या फंक्शनला सर्वात खास दिसायचं तर लक्षात ठेवा ७ टिप्स... दिसा स्पेशल

राखीपौर्णिमा किंवा सत्यनारायण पुजेच्या निमित्ताने आपल्याला कुठे जायचे असल्यास पावसाची थोडी हलकी साडी नेसावी. अशावेळी नेहमीच्या काठाच्या साडीपेक्षा थोडी डिझायनर किंवा कॉटन सिल्क प्रकारातील साडी आपल्याला छान सोबर लूक देऊ शकते. तसेच यावेळी आपण लहान मंगळसूत्रासोबत एखादा छानसा ट्रेंडी लूक देणारा नेकलेस आणि कानातल्याचा सेटही नक्की कॅरी करु शकतो.

मंगळागौर, राखीपौर्णिमेच्या फंक्शनला सर्वात खास दिसायचं तर लक्षात ठेवा ७ टिप्स... दिसा स्पेशल

आता पावसाळ्यात मेकअप करताना काळजी घेणे महत्त्वाचे असते. दमट आणि ओलसर वातावरणात मेकअप करताना खूप उत्पादने वापरण्यापेक्षा थोडक्यात आणि साजेसा मेकअप करावा. चेहऱ्यालाही मॉइश्चरायजर, लिक्विड फाऊंडेशन आणि फाऊंडेशन पावडर इतके पुरेसे असते.

मंगळागौर, राखीपौर्णिमेच्या फंक्शनला सर्वात खास दिसायचं तर लक्षात ठेवा ७ टिप्स... दिसा स्पेशल

डोळ्यांचा मेकअप करताना ते खूप हायलाइट होणार नाहीत ना असे पाहावे. कारण लहान कार्यक्रमाला डोळ्यांना खूप मेकअप केलेला चांगला दिसत नाही. त्यामुळे काजळ, मस्कारा या गोष्टी अशावेळी शक्यतो टाळलेल्याच बऱ्या. वॉटरप्रूफ आय लायनर अवश्य वापरावा. त्यामुळे डोळे उठून दिसायला मदत होते.

मंगळागौर, राखीपौर्णिमेच्या फंक्शनला सर्वात खास दिसायचं तर लक्षात ठेवा ७ टिप्स... दिसा स्पेशल

लिपस्टीक लावताना ती आपल्या साडीच्या रंगाला साजेशी असेल असे पाहावे. नेहमीपेक्षा थोडी गडद रंगाची लिपस्टीक निवडली तरी चालू शकते. बाकी मेकअप जास्त नसल्याने लिपस्टीक डार्क असेल तरी आपण उठून दिसतो. लिपस्टीक लावताना आवर्जून लिप ग्लॉस लावून मगच लिपस्टीक लावावी. तसेच लीप लायनरने ओठांच्या कडांना आकार देऊन मग लिपस्टीक लावल्यास ओठ आणखी छान दिसतात.