कितीही सुंदर डिझाइन काढली तरी मेहेंदी रंगत नाही? ४ सोपे उपाय - केमिकलशिवाय हात होतील लालचुटूक- खुलेल रंग

Updated:August 25, 2025 09:40 IST2025-08-25T09:30:00+5:302025-08-25T09:40:02+5:30

mehndi dark stain tips : how to make mehndi color Dark: natural mehndi tips: आपल्यालाही हातांवरील मेहेंदी रंगवायची असेल तर या ४ सोप्या टिप्स फॉलो करा.

कितीही सुंदर डिझाइन काढली तरी मेहेंदी रंगत नाही? ४ सोपे उपाय - केमिकलशिवाय हात होतील लालचुटूक- खुलेल रंग

लग्न असो किंवा खास सणसमारंभ या दिवशी हातावर मेहेंदी काढली जाते. गणोशोत्सवानिमित्त अनेकजणी हातांवर मेहेंदी काढतात. हातांवर काढलेल्या मेहेंदीला चांगला गडद रंग आला तर ती उठून दिसते. आपले हात अधिक आकर्षित दिसावे म्हणून आपण मेहेंदी काढतो. (mehndi dark stain tips )

कितीही सुंदर डिझाइन काढली तरी मेहेंदी रंगत नाही? ४ सोपे उपाय - केमिकलशिवाय हात होतील लालचुटूक- खुलेल रंग

परंतु अनेकदा हातांवर कितीही छान मेहेंदी काढली तरी रंग येत नाही. अशावेळी केमिकल गोष्टींशिवाय आपल्याकडे काही पर्याय नसतो. जर आपल्यालाही हातांवरील मेहेंदी रंगवायची असेल तर या ४ सोप्या टिप्स फॉलो करा. (how to make mehndi color Dark)

कितीही सुंदर डिझाइन काढली तरी मेहेंदी रंगत नाही? ४ सोपे उपाय - केमिकलशिवाय हात होतील लालचुटूक- खुलेल रंग

मेहेंदीला गडद रंग आणायचा असेल तर किमान ६ ते ८ तास किंवा रात्रभर मेहेंदी हातावर राहू द्या. मेहेंदी जितकी जास्त वेळ लावली जाईल. तितकाच तिचा रंग गडद होईल, तो सहजासहजी निघणार नाही.

कितीही सुंदर डिझाइन काढली तरी मेहेंदी रंगत नाही? ४ सोपे उपाय - केमिकलशिवाय हात होतील लालचुटूक- खुलेल रंग

मेहेंदी लावण्यापूर्वी हातांवर थोडेसे निलगिरीचे तेल लावून चांगले पसरवा. तेलाचे प्रमाण हे अधिक नसायला हवे. तेल मेहेंदीचा रंग आणखी गडद करण्यास मदत करते.

कितीही सुंदर डिझाइन काढली तरी मेहेंदी रंगत नाही? ४ सोपे उपाय - केमिकलशिवाय हात होतील लालचुटूक- खुलेल रंग

लिंबू आणि साखरेचे मिश्रण मेहेंदीला अधिक गडद करण्यास मदत करते. मेहेंदी सुकल्यानंतर एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा साखर मिसळा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने हातांवर लावा. यामुळे गडद रंग येण्यास मदत होईल.

कितीही सुंदर डिझाइन काढली तरी मेहेंदी रंगत नाही? ४ सोपे उपाय - केमिकलशिवाय हात होतील लालचुटूक- खुलेल रंग

मेहेंदी काढल्यानंतर एका तव्यावर ४ ते ५ लवंगा गरम करुन घ्या. त्याचा धूर हातावर घ्या. ज्यामुळे मेहेंदी रंगण्यास अधिक मदत होईल.

कितीही सुंदर डिझाइन काढली तरी मेहेंदी रंगत नाही? ४ सोपे उपाय - केमिकलशिवाय हात होतील लालचुटूक- खुलेल रंग

मेहेंदी धुतल्यानंतर लगेच साबण, हॅडवॉश किंवा कोणतेही रासायनिक उत्पादन वापरु नका. मेहेंदी लावलेल्या भागावर स्क्रबिंग किंवा ब्लीचिंग उत्पादने देखील वापरु नका. मेहेंदी पूर्णपणे सुकल्यानंतर आणि रंग आल्यानंतर क्रीम, लोशन किंवा तेल वापरा.