उन्हाळ्यात घामामुळे केसांना कुबट दुर्गंधी येते? करा ६ घरगुती उपाय, चिकट केस-घाण वास गायब...

Updated:May 17, 2025 16:39 IST2025-05-17T15:55:45+5:302025-05-17T16:39:15+5:30

How to get rid of smelly hair due to sweat during summer season : Hair Care Tips To Prevent Sweaty Scalp In Summer : Remedies to Get Rid of Smelly Scalp at Home : Avoid Sweaty Scalp In Summer : आपण नेमके कोणते घरगुती उपाय करून केसांतील घामाची दुर्गंधी कमी करू शकतो, ते पाहूयात...

उन्हाळ्यात घामामुळे केसांना कुबट दुर्गंधी येते? करा ६ घरगुती उपाय, चिकट केस-घाण वास गायब...

उन्हाळ्यात घाम येणं सहाजिक आहे. शरीरासोबतच हा घाम (How to get rid of smelly hair due to sweat during summer season) आपल्या डोक्यांत - केसांत देखील येतोच. घाम येणे ही खरंतर, एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु त्या घामातून येणारी दुर्गंधी मात्र तितकीच त्रासदायक असते. विशेषतः केस लांब असतील, किंवा वारंवार धुणं शक्य नसेल, तर घामाची दुर्गंधी ही कायमच येत राहते.

उन्हाळ्यात घामामुळे केसांना कुबट दुर्गंधी येते? करा ६ घरगुती उपाय, चिकट केस-घाण वास गायब...

उन्हाळ्यात केस स्वच्छ धुतले नाहीत तर अशी घामाची दुर्गंधी (Hair Care Tips To Prevent Sweaty Scalp In Summer) केसांना कायमच येत राहते. केसांमधील घामामुळे केस चिकट होतातच, शिवाय केसांना दुर्गंधी देखील येते, अशावेळी केसांच्या येणाऱ्या दुर्गंधीमुळे काहीवेळा आपल्याला चारचौघीत लाजिरवाणे वाटते.

उन्हाळ्यात घामामुळे केसांना कुबट दुर्गंधी येते? करा ६ घरगुती उपाय, चिकट केस-घाण वास गायब...

यासाठीच, उन्हाळ्यात केसांना घाम येऊन दुर्गंधी येऊ नये म्हणून आपण नेमके कोणते घरगुती उपाय करून केसांतील घामाची दुर्गंधी कमी करू शकतो, ते पाहूयात...

उन्हाळ्यात घामामुळे केसांना कुबट दुर्गंधी येते? करा ६ घरगुती उपाय, चिकट केस-घाण वास गायब...

उन्हाळ्यात केसांमधून घामाची दुर्गंधी दूर करायची असेल तर कडुलिंब तुळशीच्या पानांचे हर्बल हेअर वॉश आपण वापरु शकतो. यासाठी, सगळ्यांत आधी कडुलिंब आणि तुळशीची पाने पाण्यांत उकळा. जेव्हा ते व्यवस्थित उकळते तेव्हा गॅस बंद करा, थंड होऊ द्या आणि केस धुण्यापूर्वी हे स्काल्पवर लावा. अर्धा तास असेच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने केस धुवा. तुळस आणि कडुलिंब केसांमधील दुर्गंधी दूर करतातच तसेच स्काल्पला होणारा संसर्गही दूर करतात.

उन्हाळ्यात घामामुळे केसांना कुबट दुर्गंधी येते? करा ६ घरगुती उपाय, चिकट केस-घाण वास गायब...

लिंबाचा रस केसांच्या अनेक समस्या सोडवतात, शिवाय घामाचा वासही दूर करतात. यासाठी, सगळ्यात आधी लिंबाचा रस पिळून घ्या आणि एका भांड्यात काढा. यानंतर, कापसाच्या मदतीने हा लिंबाचा रस स्कॅल्पवर लावा. दहा मिनिटांसाठी लिंबाचा रस स्काल्प आणि केसांवर असाच राहू द्यावा. त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यावेत. लिंबाचा रस स्काल्पला डिटॉक्स करतो, ज्यामुळे घामाची दुर्गंधी नाहीशी होते. लिंबाचा रस वापरण्यापूर्वी, एकदा पॅच टेस्ट करा, कारण लिंबाच्या रसात आढळणारे घटक कधीकधी समस्या निर्माण करतात.

उन्हाळ्यात घामामुळे केसांना कुबट दुर्गंधी येते? करा ६ घरगुती उपाय, चिकट केस-घाण वास गायब...

केसांमधील घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी बेकिंग सोडा फायदेशीर ठरेल. यासाठी १ टेबलस्पून बेकिंग सोडा थोड्या पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट केसांच्या मुळांवर लावा आणि १० मिनिटांनी केस स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यातून १ ते २ वेळा करा, यामुळे केसांतून येणारी घामाची दुर्गंधी कमी होते.

उन्हाळ्यात घामामुळे केसांना कुबट दुर्गंधी येते? करा ६ घरगुती उपाय, चिकट केस-घाण वास गायब...

तुळशीची पाने आणि मेथी दाणे पाण्यात उकळून, थंड झाल्यावर ते पाणी केसांना लावा. ह्यामुळे घामाचा दुर्गंध कमी होतो आणि स्कॅल्प व केसांना उन्हाळ्यात थंडावा मिळतो.

उन्हाळ्यात घामामुळे केसांना कुबट दुर्गंधी येते? करा ६ घरगुती उपाय, चिकट केस-घाण वास गायब...

आवळ्याचा रस काढून तो थेट स्कॅल्पवर लावावा याचबरोबर, आपण आवळ्याची पावडर पाण्यात भिजवून त्याची पेस्ट तयार करून देखील लावू शकता. त्यानंतर अर्धा तास हे मिश्रण केसांवर तसेच लावून ठेवावे, मग केस स्वच्छ धुवून घ्यावेत. यामुळे केसांमधून घामाची दुर्गंधी नाहीशी होते.

उन्हाळ्यात घामामुळे केसांना कुबट दुर्गंधी येते? करा ६ घरगुती उपाय, चिकट केस-घाण वास गायब...

गुलाबपाणी, थोडा लिंबाचा रस आणि पाण्याचा स्प्रे तयार करा. केसांवर या मिश्रणाचा फवारा द्या. हा स्प्रे म्हणजे केसांसाठी नॅचरल हेअर परफ्यूम होऊ शकतो. या उपायामुळे केसांतील घामाची दुर्गंधी कमी होते.