केस गळून टक्कल पडण्याची वेळ आली? ७ पदार्थ खायला लगेच सुरुवात करा, केस गळणं थांबेल
Updated:January 8, 2026 12:56 IST2026-01-08T12:48:48+5:302026-01-08T12:56:42+5:30

केस गळण्याचं प्रमाण खूप वाढलं असेल तर ही समस्या सोडविण्यासाठी केसांवर वरवरचे उपाय करण्यापेक्षा मुळापासूनच केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवे.(how to get rid of hair fall?)
आणि त्यासाठीचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे आहार. आहारातून केसांसाठी पोषक ठरणारे पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ले तर केसांचं आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होते. केस गळणं कमी होऊन ते लांब, दाट होऊ लागतात.(7 superfood to reduce hair loss)
त्यासाठी कोणते पदार्थ नियमितपणे खायला हवे, याविषयीची माहिती डॉक्टरांनी drmanasi_clinic या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(home hacks for long and strong hair)
त्यातला पहिला पदार्थ म्हणजे अंजीर. अंजीरमधून लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात मिळतात. रात्री झाेपण्यापुर्वी अंजीर पाण्यात भिजत घाला आणि दुसऱ्यादिवशी ते खा.
कडिपत्ता कोणत्या ना कोणत्या स्वरुपात रोज खायला हवा. त्यामध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स केसांची मुळं पक्की करण्यासाठी मदत करतात.
त्याचप्रमाणे कडिपत्त्याचं तेल घरी तयार करून ते केसांना नियमितपणे लावा. केस अकाली पांढरे होणार नाहीत. यासाठी एक वाटी खोबरेल तेलामध्ये पाव ते अर्धी वाटी कडिपत्त्याची पानं क्रश घालून घाला आणि तेल उकळून गाळून घ्या.
तीळ देखील केसांचं गळणं कमी करण्यासाठी खूप मदत करतात. तिळाचे वेगवेगळे पदार्थ आहारात घ्यायला हवेत.
केसांसाठी एरंडेल तेल किंवा कॅस्टर ऑईलदेखील खूप उपयुक्त ठरतं. ज्या भागातले केस खूप विरळ झाले आहेत, तिथे काही दिवस नियमितपणे एरंडेल तेल लावा. चांगला फरक दिसून येईल.
अळीव, डिंक आणि गुळ घालून केलेली खीर आठवड्यातून एकदा खाल्ल्यास हाडांची ताकद वाढून केसही दाट, मजबूत होण्यास मदत होईल.
याशिवाय कॅल्शियम आणि फायबर जास्त प्रमाणात असणारी नाचणीदेखील केसांच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरते.