कोंड्यामुळे डोक्यात सतत खाज येते? जावेद हबीब सांगतात कोंडा घालवून टाकण्याचा भन्नाट उपाय
Updated:December 3, 2025 16:34 IST2025-12-03T16:26:35+5:302025-12-03T16:34:23+5:30

हिवाळ्याचे दिवस सुरू झाले की त्वचा कोरडी पडायला लागते. त्याचा परिणाम स्काल्पवरही होतो आणि मग डोक्यात खूप कोंडा व्हायला लागतो.
डोक्यात कोंडा वाढला की सतत डोक्यात खाज येते. त्याचा परिणाम केसांवरही होतो आणि केसही खूप गळायला लागतात.
शिवाय डोक्यातल्या कोंड्यामुळे अनेकींच्या कपाळावरही या दिवसांत खूप पिंपल्स आलेले दिसतात. हे सगळे त्रास घालवायचे असतील तर डोक्यातला कोंडा घालवायलाच हवा.
त्यासाठीच सेलिब्रिटी ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी एक सोपा घरगुती उपाय सांगितला आहे. त्यासाठी एका वाटीमध्ये २ चमचे आल्याचा रस घ्या.
त्यामध्ये दिड ते दोन चमचे खोबरेल तेल घाला. आता या मिश्रणाने केसांच्या मुळाशी मालिश करा. त्यानंतर एखाद्या तासाने केस धुवून टाका. आल्यामध्ये ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म कोंड्याचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात.
डोक्यात कोंडा असल्यास झिंकयुक्त पदार्थही जास्तीतजास्त प्रमाणात खायला हवे. त्यामुळेही डोक्यातला संसर्ग कमी होतो.
लिंबाचा रस आणि खोबरेल तेल यांचे मिश्रण डोक्याला हलक्या हाताने लावा. अर्ध्या तासाने केस धुवून टाका. कोंडा कमी होईल.
आंबट दही डोक्याला लावून एखाद्या तासाने केस धुतल्यासही कोंडा खूप कमी होतो.