डोक्यातल्या कोंड्यामुळे हैराण? चमचाभर कापूर 'या' पद्धतीने वापरा- ७ दिवसांत कोंडा गायब
Updated:January 10, 2026 17:22 IST2026-01-10T11:45:55+5:302026-01-10T17:22:29+5:30

हिवाळ्याच्या दिवसांत जवळपास प्रत्येकाला जाणवणारी एक समस्या म्हणजे डोक्यात वाढलेले कोंड्याचे प्रमाण. या दिवसांत डोक्यातला कोंडा खूप जास्त वाढतो.
बऱ्याचदा तर ॲण्टीडँड्रफ शाम्पू वापरूनही काही उपयोग होत नाही. उलट केस आणखीनच कोरडे होत जातात.
म्हणूनच आता डोक्यांतला कोंडा घालविण्यासाठी एक अतिशय सोपा घरगुती उपाय करून पाहा.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला कापुराच्या वड्या वापरायच्या आहेेत. सगळ्यात आधी तर कापुराच्या वड्या कुस्करून त्याची पावडर करून घ्या.
आता एक चमचा कापुराची पावडर २ चमचे तेलामध्ये मिसळा. यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल, मोहरीचं तेल, तिळाचं तेल घेऊ शकता. पण खोबरेल तेल आणि कॅस्टर ऑईल मात्र टाळायला हवं असा सल्ला एक्सपर्टनी deepak.fitness_coach या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
यानंतर हे तेल आता हळूवार मालिश करत केसांच्या मुळाशी लावा. रात्रभर हे तेल डोक्याला ठेवू नका. साधारण दिड ते दोन तास ठेवावे.
त्यानंतर एखादा ॲण्टीडँड्रफ शाम्पू वापरून केस धुवून टाका. हिवाळ्याच्या दिवसांत आठवड्यातून एकदा हा उपाय करा. एक आठवड्यातच खूप चांगला फरक दिसून येईल.