केस बिच्चारे, चुकीच्या शाम्पूचे बळी! केसांच्या प्रकारानुसार निवडा शाम्पू, पाहा ‘हे’ घटक आहेत का?

Updated:March 22, 2025 19:44 IST2025-03-22T19:28:26+5:302025-03-22T19:44:41+5:30

Hair Care How To Find The Best Shampoo For Hair : How To Choose The Right Shampoo For Your Hair Type : How to Choose the Best Shampoo : केसांच्या प्रकारानुसार नक्की कोणता शाम्पू वापरावा ते पाहा, केसांसाठी शाम्पू निवडताना लक्षात ठेवा...

केस बिच्चारे, चुकीच्या शाम्पूचे बळी! केसांच्या प्रकारानुसार निवडा शाम्पू, पाहा ‘हे’ घटक आहेत का?

केस स्वच्छ धुण्यासाठी आपण शाम्पूचा वापर करतो. परंतु आपले केस (How To Choose The Right Shampoo For Your Hair Type) आणि डोक्यातील त्वचेचा प्रकार ओळखून मगच योग्य तो शाम्पू केसांसाठी वापरणे अधिक फायदेशीर ठरते. केसांना चुकीच्या पद्धतीने चुकीचा शाम्पू लावला तर त्याचा फायदा होण्याऐवजी केसांचे नुकसानच होईल.

केस बिच्चारे, चुकीच्या शाम्पूचे बळी! केसांच्या प्रकारानुसार निवडा शाम्पू, पाहा ‘हे’ घटक आहेत का?

यासाठीच, केसांची योग्य ती काळजी घेण्यासाठी (How to Choose the Best Shampoo) केसांच्या प्रकारानुसार तुमच्या शाम्पूमध्ये कोणकोणते घटक असणे गरजेचे आहे, ते पाहा..

केस बिच्चारे, चुकीच्या शाम्पूचे बळी! केसांच्या प्रकारानुसार निवडा शाम्पू, पाहा ‘हे’ घटक आहेत का?

तेलकट केसांसाठी, तुम्ही असे शाम्पू खरेदी करा की ज्यात टी ट्री ऑइल, ग्रीन टी, ॲप्पल सायडर व्हिनेगर, लिंबू आणि पुदिना यासारखे घटक असतील. हे सर्व घटक स्काल्पवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करतील. चुकूनही मॉइश्चरायझिंग किंवा हायड्रेटिंग घटक असलेले शाम्पू वापरू नका, असे शाम्पू वापरल्याने केसांमध्ये जास्तीचे तेल जमा होईल.

केस बिच्चारे, चुकीच्या शाम्पूचे बळी! केसांच्या प्रकारानुसार निवडा शाम्पू, पाहा ‘हे’ घटक आहेत का?

जर तुमचे केस आणि स्काल्प दोन्ही कोरडी असेल तर असा शाम्पू खरेदी करावा ज्यामध्ये नारळाचे तेल, शिया बटर, कोरफड, मध आणि एवोकॅडो सारखे घटक असतील. हे घटक स्काल्प मधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेटिंग शाम्पू वापरून तुम्ही तुमच्या केसांमध्ये जीवंतपणा आणू शकता.

केस बिच्चारे, चुकीच्या शाम्पूचे बळी! केसांच्या प्रकारानुसार निवडा शाम्पू, पाहा ‘हे’ घटक आहेत का?

जर तुमच्या केसांत कोंडा जास्त असेल तर तुम्ही असा शाम्पू निवडावा ज्यामध्ये टी ट्री ऑइल, झिंक पायरिथिओन, सॅलिसिलिक ॲसिड, कडुलिंब आणि तुळस सारखे घटक असतील. या घटकांमुळे, डोक्यातील कोंडा नाहीसा होईल. याचबरोबर, कधीही डीप-क्लीनिंग शाम्पू वापरू नये, यामुळे कोंड्याची समस्या कमी होण्याऐवजी वाढते.

केस बिच्चारे, चुकीच्या शाम्पूचे बळी! केसांच्या प्रकारानुसार निवडा शाम्पू, पाहा ‘हे’ घटक आहेत का?

जर हेअरफॉल फार मोठ्या प्रमाणांत होत असेल तर बायोटिन, केराटिन, आवळा, भृंगराज, जास्वंदी आणि ग्रीन टी सारखे घटक असलेले शाम्पू वापरा. हे घटक केस गळती रोखण्यास मदत करतील.