घामामुळे चेहऱ्यावर मळाचे थर, काळेपणा आलाय? अर्धा बटाटा या पद्धतीने लावा, ग्लो करेल चेहरा

Published:May 16, 2024 03:55 PM2024-05-16T15:55:27+5:302024-05-16T16:06:20+5:30

How to Apply Potato On Face For Glowing Skin : डाग दूर करण्यासाठी आणि त्वचा मऊ करण्यासाठी बटाट्याचा रस आणि दूध एकत्र करून चेहऱ्यावर लावू शकता

घामामुळे चेहऱ्यावर मळाचे थर, काळेपणा आलाय? अर्धा बटाटा या पद्धतीने लावा, ग्लो करेल चेहरा

स्किन केअरमध्ये अशा पदार्थांचा समावेश केला जातो. जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. ऊन्हामुळे चेहऱ्याचा पोत बिघडतो आणि चेहरा डल दिसू लागतो. चेहरा उजळवण्यासााठी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. बटाटा आपल्या खाण्यापिण्याचा एक भाग आहे. स्किन केअर रूटीनमध्ये तुम्ही बटाट्याचा समावेश करू शकता.

घामामुळे चेहऱ्यावर मळाचे थर, काळेपणा आलाय? अर्धा बटाटा या पद्धतीने लावा, ग्लो करेल चेहरा

बटाट्यात जिंक, सल्फर, कॉपर, यांसारखे एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे त्वचेला बरेच फायदे मिळतात. बटाटा चेहऱ्याला लावल्याने ड्राय स्किनची समस्या कमी होते. डाग कमी होतात. बटाट्याचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावर ग्लो आणू शकता.

घामामुळे चेहऱ्यावर मळाचे थर, काळेपणा आलाय? अर्धा बटाटा या पद्धतीने लावा, ग्लो करेल चेहरा

बटाटा चेहऱ्यावर वापरण्याचा पहिला मार्ग म्हणजे त्याचा रस काढून टोनरप्रमाणे चेहऱ्यावर लावणे. यासाठी एक बटाटा घेऊन तो किसून पिळून घ्या. बटाट्याचा रस कापसाच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांनी चेहरा धुवा. दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बटाट्याचा रस चेहऱ्यावर डागही कमी होऊ लागतात.

घामामुळे चेहऱ्यावर मळाचे थर, काळेपणा आलाय? अर्धा बटाटा या पद्धतीने लावा, ग्लो करेल चेहरा

त्वचेवर चमक आणण्यासाठी बटाट्याचा फेस पॅक लावता येतो. हा फेसपॅक बनवण्यासाठी अर्धा बटाटा घेऊन त्यावर चोळा. त्यात अर्धा चमचा बेसन मिक्स करून त्यात फक्त अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालता येते. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा धुवा. त्वचा सुधारेल आणि चमकदार दिसेल.

घामामुळे चेहऱ्यावर मळाचे थर, काळेपणा आलाय? अर्धा बटाटा या पद्धतीने लावा, ग्लो करेल चेहरा

डाग दूर करण्यासाठी आणि त्वचा मऊ करण्यासाठी बटाट्याचा रस आणि दूध एकत्र करून चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी 2 चमचे दूध आणि एका बटाट्याचा रस मिसळा. या मिश्रणात ग्लिसरीनचे काही थेंब टाकता येतात. हे तयार मिश्रण कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने चेहरा धुवून स्वच्छ करा. आठवड्यातून दोनदा अशा प्रकारे बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावू शकता.

घामामुळे चेहऱ्यावर मळाचे थर, काळेपणा आलाय? अर्धा बटाटा या पद्धतीने लावा, ग्लो करेल चेहरा

(Image Credit- Social Media)