उरलेल्या भाताचा भन्नाट उपाय, शिळ्या भातानं करा केरेटिन ट्रिटमेंट! केस पाहून मैत्रिणी विचारतील पार्लरचा पत्ता...
Updated:April 15, 2025 17:05 IST2025-04-15T17:00:00+5:302025-04-15T17:05:01+5:30
homemade keratin treatment for frizzy hair: natural keratin treatment at home: how to use flaxseed for hair straightening: homemade hair spa for dry hair: केमिकल्स असणाऱ्या उत्पादनाचा सतत वापर केल्याने केसांचा पोत बिघडतो. त्यासाठी घरगुती उपाय चांगले ठरतात.

आपले केस सुंदर आणि लांबसडक दिसावे असं प्रत्येकालाच वाटतं. केस चांगले दिसण्यासाठी आपण महागड्या पार्लरमध्ये जाऊन खर्च करतो. स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग किंवा कलर करुन आपण केसांना अधिक सुंदर बनवतो. (homemade keratin treatment for frizzy hair)
ताण- प्रदूषण आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे केसांवर त्याचा परिणाम होतो.(natural keratin treatment at home) ज्यामुळे केस गळतीच्या समस्या वाढतात. तसेच केस झाडूसारखे होतात.(how to use flaxseed for hair straightening) अशावेळी केसगळती आणि केसांना शायनी-सिल्की करण्यासाठी आपण पार्लरमध्ये केरेटिन ट्रिटमेंट करतो.
महागड्या पार्लरचा खर्च थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय केल्यास केसांचा पोत सुधारेल. या ट्रिटमेंटमुळे केस रिपेअर होण्यास आणि केसांची वाढ होण्यास मदत होईल.
केमिकल्स असणाऱ्या उत्पादनाचा सतत वापर केल्याने केसांचा पोत बिघडतो. त्यासाठी घरगुती उपाय चांगले ठरतात.
भात, दही आणि नारळाचे तेल मिक्सरच्या भांड्यात वाटून त्याची पेस्ट तयार करुन केसांना लावा.२० ते २५ मिनिटे ठेवा, त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा केला तर आपल्याला नक्की फायदा होईल
केसांना मऊ-मुलायम करण्यासाठी आपण अळशीला पाण्यात उकळवून थंड करुन त्याचे दाटसर निघणारे पाणी केसांना लावा. यामुळे देखील केस चांगले होण्यास मदत होईल.
केसांना आपण तांदळाचे पाणी देखील लावू शकतो. यामध्ये ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाचे तेल घालून देखील केसांना लावता येईल. तांदळाच्या पाण्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यामुळे केस मजबूत आणि शायनी होतात.