फक्त १ बीट घ्या आणि करा 'हा' उपाय, केस गळणं बंद, काही दिवसांतच केस होतील दाट- लांबसडक
Updated:November 6, 2024 16:23 IST2024-11-05T16:46:35+5:302024-11-06T16:23:52+5:30

केस गळण्याचं प्रमाण हल्ली खूप जास्त वाढलं आहे. कारण आहारातून केसांना पुरेसं पोषण मिळत नाही. शिवाय धूर, ऊन, प्रदुषण यांचाही परिणाम केसांवर होतोच.(how to control hair loss?)
बऱ्याच ठिकाणी केस धुण्यासाठी बोअरवेलचं पाणी वापरलं जातं. या पाण्यात क्षार जास्त असल्यानेही केस गळण्याचं प्रमाण वाढत आहे, असं ब्यूटी एक्सपर्ट सांगतात.
म्हणूनच तुमच्या केसांना पुरेसं पोषण देण्यासाठी आता हा एक सोपा उपाय करून पाहा (home remedies for long hair). हा उपाय करण्यासाठी आपण बीटरुटचा वापर करणार आहोत (use of beetroot for hair growth). यामुळे केसांना योग्य ते पौष्टिक घटक मिळतील आणि त्यामुळे केसांची मुळं पक्की होऊन त्यांची वाढ चांगली होईल अशी माहिती kailashayogastudiorishikesh या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
हा उपाय करण्यासाठी एक मध्यम आकाराचं बीटरुट घ्या. ते मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस काढून घ्या.
हा रस केसांच्या मुळाशी लावा आणि साधारण १ तास केस तसेच राहू द्या.
त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास केस गळण्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होईल, असं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.