कोरडे-बेजान-चिकट केसही महिनाभरात होतील सिल्की-मऊमऊ! पाहा ‘हा’ सोपा घरगुती उपाय
Updated:June 25, 2025 17:45 IST2025-06-25T15:50:04+5:302025-06-25T17:45:58+5:30

काही जणींचे केस खूप फ्रिझी असतात. यालाच आपण चिकट केस असंही म्हणतो. अशा प्रकारच्या केसांमध्ये सिल्कीपणा अजिबातच नसतो.
शिवाय काही जणांचे केस एवढे ड्राय झालेले असतात की ते हातालाही खूप खरखरीत वाटतात. तुमच्याही केसांचं टेक्स्चर असंच झालं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा.
हा उपाय करण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये २ चमचा मेथी दाणे घाला.
त्यामध्ये २ चमचे तांदूळही घाला. तांदळाचं पाणी केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरते.
आता त्यामध्येच २ चमचे कलौंजी घाला. कलौंजीमुळेही केस पटापट वाढण्यास आणि दाट होण्यास मदत होते. हे पाणी रात्रभर झाकून ठेवा.
दुसऱ्यादिवशी त्या पाण्यामध्ये २ ते ३ जास्वंदाची फुलं आणि रोजमेरी घाला आणि ते पाणी गॅसवर उकळायला ठेवा. जेव्हा पाणी अर्धे होईल तेव्हा गॅस बंद करा.
यानंतर ते पाणी गाळून घ्या आणि एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. दररोज दिवसातून एकदा हे पाणी केसांच्या मुळाशी शिंपडा.
नियमितपणे हा उपाय केल्यास काही दिवसांतच केस छान मऊ, दाट आणि सिल्की झालेले जाणवतील. तसेच केसांची वाढही चांगली होईल.