केस गळून टक्कल पडण्याची वेळ आली? रात्री केसांना लावा 'हे' पाणी, महिनाभरात नव्याने केस उगवतील
Updated:December 26, 2025 16:06 IST2025-12-26T16:01:26+5:302025-12-26T16:06:36+5:30

केस गळण्याची समस्या खूप लोकांना जाणवते आहे. सध्या तर हिवाळा असल्याने केस गळण्याचे प्रमाण जरा जास्तच वाढलेले आहे.
केस गळणं कमी करायचं असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहा. केस गळण्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल.
हा उपाय करण्यासाठी एका काचेच्या बाटलीमध्ये अर्धा ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये १ चमचा मेथी दाणे घाला. केसांची मुळं पक्की करण्यासाठी मेथ्या खूप उपयुक्त ठरतात.
त्यामध्ये १ चमचा कलौंजी घाला. केसांची वाढ होण्यासाठी कलौंजीचा उपयोग होतो.
आता त्यामध्येच १० ते १२ लवंग घाला. लवंग घातल्यामुळे केसांमधला कोंडा कमी होतो. त्यामुळे आपोआपच केस गळण्याचं प्रमाणही कमी होतं.
यानंतर सगळ्यात शेवटी त्यामध्ये कडिपत्त्याची काही पानं घाला. कडिपत्त्यामुळे केस गळणं तर कमी होतंच, पण कमी वयात केस पांढरे होण्याचं प्रमाणही कमी होतं. आता बाटलीचं झाकण लावून ती जिथे स्वच्छ सुर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवा.
दोन दिवसांनंतर हे पाणी तुम्ही वापरू शकता. हे पाणी रात्री झोपण्यापुर्वी केसांच्या मुळाशी अलगद मसाज करून लावा. यानंतर लगेचच केस धुण्याची गरज नाही. रोज काही दिवस नियमितपणे हा उपाय करून पाहा. केस गळण्याचं प्रमाण बरंच कमी झालेलं जाणवेल.