केस नॅचरली काळे करण्याचा सोपा उपाय- फक्त ‘हे’ २ पदार्थ लावा, विसरा डाय आणि हेअर कलर कायमचा..
Updated:March 5, 2026 15:51 IST2026-03-05T15:44:02+5:302026-03-05T15:51:46+5:30

कमी वयात केस पांढरे होण्याचं प्रमाण सध्या खूपच वाढलं आहे. यासाठी कित्येक गोष्टी जबाबदार आहेत. पण केस कमी वयात पांंढरे होऊ लागले की अनेकांचा कॉन्फिडन्सही कमी होऊ लागतो.(home hacks for naturally black hair)
पांढरे केस काळे करण्यासाठी वारंवार मेहेंदी लावणंही खूप किचकट आणि वेळखाऊ वाटतं. शिवाय केमिकलयुक्त हेअर कलर किंवा हेअर डाय केसांवर लावायलाही नकोसं वाटतं.(how to turn gray hair into black naturally?)
म्हणूनच आता पुढे सांगितलेला एक उपाय करून पाहा. हा उपाय जर तुम्ही काही दिवस नियमितपणे केला तर तुमचे केस नक्कीच मुळापासून नॅचरली काळे होण्यास मदत होईल.
हा उपाय करण्यासाठी एका लोखंडी कढईमध्ये २ चमचे मोहरीचं तेल घ्या. मोहरीचं तेल केसांसाठी अतिशय चांगलं असतं.
आता या मध्ये १ चमचा हळद घाला. हळदीमधले ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक डोक्याच्या त्वचेला असणारं इन्फेक्शन कमी करण्यासाठी मदत करतात.
आता यामध्ये १ चमचा कॉफी पावडर घाला. कॉफी पावडरमुळे केसांना नॅचरल रंग येण्यास मदत होते शिवाय केस चमकदार, सिल्की होतात. आता यामध्ये एका लिंबाचा रस घाला. लिंबाच्या रसामुळे डोक्यातला कोंडा कमी होतो.
आता हे मिश्रण गॅसवर गरम करायला ठेवा. जोपर्यंत या मिश्रणाला काळा रंग येत नाही, तो पर्यंत ते हलवत राहा. काळसर झाल्यानंतर गॅस बंद करा. हा झाला नॅचरल हेअर कलर तयार. आता हा रंग मेहेंदी लावतो त्याप्रमाणे केसांना लावा आणि अर्ध्या ते पाऊण तासाने माईल्ड शाम्पू वापरून केस धुवा.
महिन्यातून ३ ते ४ वेळा हा उपाय करा. केस नॅचरली काळे होण्यासाठी मदत होईल.