Join us   

होली है.... म्हणत बिंधास्त रंग खेळताना केसांचीही काळजी घ्या, ५ सोप्या टिप्स- केस राहतील सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2024 9:18 AM

1 / 8
होली है... होली है... असं दणाणून सांगणारा होळीचा उत्साह आता सगळीकडे दिसायला सुरुवात झालेली आहे..
2 / 8
या सणात आपण उत्साहात रंग खेळताे. पण रंग खेळण्यापुर्वी जर आपण योग्य ती काळजी घेतली नाही, तर मात्र मग त्याचा वाईट परिणाम नंतर केसांवर आणि त्वचेवर दिसून येतो.
3 / 8
आधीच प्रत्येकाला केसांशी संबंधित कोणत्या ना कोणत्या समस्या आहेतच. त्यात पुन्हा त्या समस्यांमध्ये वाढ व्हायला नको म्हणून रंग खेळण्यापुर्वी केसांची थोडी काळजी घ्या. यासाठी नेमकं काय करायचं ते आता पाहूया..
4 / 8
रंग खेळण्यापुर्वी केसांच्या मुळाशी ॲलोव्हेरा जेल लावा. यामुळे कोणताही रंग थेट केसांच्या मुळापर्यंत जाऊ शकणार नाही.
5 / 8
दुसरा उपाय म्हणजे मुळापासून ते केसांच्या शेवटच्या टोकापर्यंत केसांना व्यवस्थित खोबरेल तेल लावा. यामुळे केस रंगापासून सुरक्षित राहतील.
6 / 8
तिसरा उपाय म्हणजे केस मोकळे सोडून रंग खेळू नका. यामुळे केसांचं खूप नुकसान होतं. केस कोरडे होतात. त्यामुळे केसांची वेणी किंवा अंबाडा घाला. पण तो ही खूप घट्ट नको. अन्यथा केस मुळापासून तुटतील.
7 / 8
रंग खेळताना टोपी किंवा स्कार्फ लावून केसांना सुरक्षित ठेवता आलं तर अधिक चांगलं.
8 / 8
रंग खेळताना जास्त वेळ उन्हात उभं राहू नका. यामुळे केसांचं नुकसान होईल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजी