फक्त ७ स्टेप्समध्ये घरीच करा पार्लरसारखा हेअर स्पा! सणावाराला केस दिसतील सुंदर - बदलून जाईल लूक...
Updated:August 30, 2025 22:05 IST2025-08-30T22:00:00+5:302025-08-30T22:05:01+5:30
Hair spa at home top 7 steps for korean like shiny hair : hair spa at home steps : how to do hair spa at home : 7 steps hair spa at home : सणावाराच्या घाईगडबडीत पार्लरला जायला वेळच नाही, मग घरीच कर पार्लरसारखा हेअर स्पा...

सध्याच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये केसांना योग्य पोषण (Hair spa at home top 7 steps for korean like shiny hair) मिळत नाही, त्यामुळे केस कोरडे, निर्जीव आणि निस्तेज होतात. प्रदूषण, धूळ आणि ताण यामुळे केसांचे आरोग्य बिघडते, पण पार्लरमध्ये जाऊन प्रत्येकवेळी महागडी हेअर स्पा ट्रीटमेंट करणे नेहमीच शक्य नसते. जर आपल्याला लांब, मजबूत आणि चमकदार केस हवे असतील तर आपण पार्लर सारखी हेअर स्पा ट्रीटमेंट अगदी घरच्याघरीच करु शकतो.
पार्लरमध्ये जाऊन महागडी हेअर स्पा ट्रीटमेंट घेण्यासाठी वेळ (how to do hair spa at home) आणि खर्च दोन्ही लागतो. याउलट, तुमचे केस मऊ, सिल्की आणि हेल्दी ठेवायचे असतील तर घरच्या घरी देखील हेअर स्पा करता येतो.
फक्त ७ सोप्या स्टेप्स फॉलो केल्या तर आपण देखील पार्लर सारखा (7 steps hair spa at home) हेअर स्पा घरीच करु शकतो. ७ सोप्या स्टेप्स ज्या वापरून तुम्ही घरच्या घरी अगदी पार्लरसारखा हेअर स्पा करू शकता. घरीच हेअर स्पा करताना नैसर्गिक घटक वापरले जातात, जे केसांना आतून पोषण देतात आणि त्यांना निरोगी करतात.
स्टेप १ :- केस स्वच्छ धुवा :-
सर्वात आधी, केस एका चांगल्या सल्फेट-फ्री शाम्पूने स्वच्छ धुवून घ्या. शाम्पूमुळे केसांमधील सर्व घाण, तेल, धूळ, माती निघून जाईल. लक्षात ठेवा, शाम्पूनंतर कंडीशनर लावू नका.
स्टेप २ :- केसांना वाफ द्या :-
स्टीमिंग केल्याने तुमच्या केसांच्या मुळांचे क्यूटिकल्स उघडतात, ज्यामुळे हेअर स्पा क्रीम केसांच्या आतपर्यंत पोहोचते. एका टॉवेलला गरम पाण्यात भिजवून पिळून घ्या आणि १५ ते २० मिनिटांसाठी डोक्याभोवती गुंडाळून ठेवा.
स्टेप ३ :- हेअर स्पा क्रीम लावा :-
आता तुमच्या आवडीची हेअर स्पा क्रीम घ्या आणि बोटांच्या मदतीने ती केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत व्यवस्थित लावा. तुमच्याकडे स्पा क्रीम नसल्यास, तुम्ही २ चमचे दही, १ चमचा मध आणि १ चमचा नारळाचे तेल एकत्र करून घरीच क्रीम बनवू शकता.
स्टेप ४ :- केसांच्या मुळांना मसाज करा :-
क्रीम लावल्यानंतर, आपल्या बोटांच्या मदतीने १० ते १५ मिनिटे डोक्याला हलक्या हाताने मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केसांची वाढ देखील जलद गतीने होते.
स्टेप ५ :- पुन्हा एकदा वाफ द्या :-
मसाज केल्यानंतर, पुन्हा एकदा गरम टॉवेलने केसांना वाफ द्या. यामुळे हेअर स्पा क्रीम केसांना आतून पोषण देण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे मदत करते.
स्टेप ६ :- केसांना कंडिशनिंग करा :-
हेअर स्पा क्रीम लावून २० मिनिटे वाट पाहण्याऐवजी, आपण केस तांदळाच्या पाण्याने देखील धुवू शकता. तांदळाचे पाणी नैसर्गिक कंडीशनर म्हणून काम करते आणि केसांना आतून मजबूत व चमकदार बनवते. हे पाणी तयार करण्यासाठी, एक कप तांदूळ ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर ते पाणी वापरा.
स्टेप ७ :- केस धुवा :-
शेवटच्या स्टेपमध्ये, तुमचे केस थंड किंवा कोमट पाण्याने चांगले धुवून घ्या. शाम्पूचा वापर करू नका. त्यानंतर फरक पाहाल की तुमचे केस मऊ, चमकदार आणि मुलायम झालेले असतील.