केस गळताहेत-हळू हळू टक्कल पडतंय? किचनमधले ५ पदार्थ केसांना लावा-लांबसडक दाट होतील केस
Updated:February 19, 2024 11:43 IST2024-02-19T11:32:59+5:302024-02-19T11:43:47+5:30
Hair Growth Tips : मोहोरीचे तेल व्हिटामीन ई आणि अन्य पोषक तत्व केसांना पोषण देतात ज्यामुळे केस मजबूत आणि लांब होण्यास मदत होते.

आजकाल केस गळण्याच्या त्रासामुळे बरेच लोक त्रस्त असतात. डोक्यावरचे, साईडचे केस खूपच गळू लागतात. हेअर लॉसकडे लक्ष न दिल्यास हळूहळू केसांवर टक्कल पडू शकते. केस गळणं थांबवण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू सकता. यामुळे तुमच्या तब्येतीचं नुकसानही होऊ शकते. केसांचे गळणं कंट्रोल करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय करायला हवेत. ज्यामुळे केसांचा पोत सुधारेल आणि केसांचे गळणंही थांबेल. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील ते पाहूया. स्काल्प हेल्दी ठेवण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी, हेअर डॅमेज टाळण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
शिकेकाई
शिकेकाई केसांच्या आरोग्यासाठी प्रभावी मानली जाते. याचा वापर तुम्ही केसांवर करू शकता. ज्यामुळे केस मजबूत होतात.
आवळा
नियमित केसांची मालिश केल्याने केसांची वाढ चांगली होते. कोकोनट ऑईल, बदामाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर तुम्ही करू शकता.
हेल्दी डाएट
हेल्दी डाएट केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. त्यात व्हिटामीन्स, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात आणि केसांची वाढ चांगली होते.
ताण-तणाापासून दूर राहा
ताण-तणाव मानसिक अशांतीने भरलेलं जीवन केसांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. यासाठी नेहमी स्थिर राहा आणि नियमित व्यायाम आणि ध्यान करा.
मोहोरीचे तेल
मोहोरीचे तेल व्हिटामीन ई आणि अन्य पोषक तत्व केसांना पोषण देतात ज्यामुळे केस मजबूत आणि लांब होण्यास मदत होते.
प्रोटीन्स आणि पोषक तत्व
आपल्या आहारात प्रोटीन, आयर्न, व्हिटामीन, जिंक यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश करा. ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.