फक्त २ रुपयांचा कापूर ठरतो केसांसाठी संजीवनी! विरळ होणारे केस होतील दाट-टक्कलही पडणार नाही
Updated:May 9, 2025 19:10 IST2025-05-09T19:07:43+5:302025-05-09T19:10:51+5:30
hair fall solution: camphor oil for hair: केसगळती आणि केसात कोंडा असेल तर कापूरचा वापर कसा करायचा पाहूया.

कसे इतके गळू लागले आहेत की टक्कलच पडेल असे आपल्या प्रत्येकालाच वाटते. अशावेळी आपण केसांना अनेक महागडे उत्पादने लावतो. ज्याच्यामुळे केस आणखी गळू लागतात. (hair fall solution)
आयुर्वेदात केस गळती,कोंडा आणि केसांच्या वाढीसाठी कापूर संजीवनी मानली जाते. नारळाच्या तेलात किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून लावल्यास केस मजबूत होतात. (camphor oil for hair)
केसगळती आणि केसात कोंडा असेल तर कापूरचा वापर कसा करायचा पाहूया. (natural hair care)
आपले केस गळत असतील किंवा केसात कोंडा झाला असेल तर कापूर हा नैसर्गिक प्रभावी उपाय ठरु शकतो. यामध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे आपल्या टाळूला निरोगी बनवतात.
नारळाच्या तेलात कापूर मिसळून लावल्याने टाळूचे रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळती थांबते.
केसांना तेल लावण्यासाठी २ चमचे नारळाचे तेल आणि १ छोटा कापूर घाला. नंतर हलके गरम करुन थंड झाल्यावर केसांना लावा. ३० मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. असे आठवड्यातून दोनदा केल्यास केसगळती थांबण्यास मदत होईल.
आपले केस कोरडे असतील तर ऑलिव्ह ऑइलमध्ये कापूर मिसळून लावा. हे टाळूला मॉइश्चरायझ करते ज्यामुळे केस तुटण्यापासून आणि गळण्यापासून रोखले जाते.