केस विंचरताना हातात येतात- खूप गळतात? तेल - शाम्पू बदलण्यापूर्वी रोज खा ही पालेभाजी, केस मुळापासून होतील मजबूत
Updated:January 15, 2026 19:00 IST2026-01-15T19:00:00+5:302026-01-15T19:00:01+5:30
hair fall while combing: hair loss problem: best leafy vegetable for hair growth: केसांना भरपूर पोषण मिळण्यासाठी आपण आहारात कोणत्या भाज्या खायला हव्यात जाणून घेऊया.

सकाळी झोपेतून उठल्यावर उशीवर पडलेले केस असोत किंवा आंघोळीनंतर विंचरताना कंगव्यात अडकलेले केसांचे पुंजके असोत यामुळे आपण कायमच चिंतेत सापडतो. अनेकदा महागड्या जाहिरातींना भुलून महागडे शॅम्पू, कंडिशनर्स आणि हेअर सिरमवर हजारो रुपये खर्च करतो. पण, आपण एक गोष्ट विसरतो की, केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य उपचारांवर नाही, तर आपल्या शरीराच्या अंतर्गत पोषणावर अधिक अवलंबून असते.(hair fall while combing)
जेव्हा आपल्या शरीरात लोह (Iron), प्रथिने (Proteins) आणि आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते, तेव्हा केसांची मुळे कमकुवत होतात. पण केसांना भरपूर पोषण मिळण्यासाठी आपण आहारात कोणत्या भाज्या खायला हव्यात जाणून घेऊया. (hair loss problem)
पालकमध्ये लोहाचे प्रमाण अत्यंत उच्च असते. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया हे केस गळण्याचे सर्वात मोठे कारण मानले जाते. जेव्हा शरीराला लोह पुरेशा प्रमाणात मिळते. तेव्हा कमकुवत झालेले केस पुन्हा मजबूत होतात.
पालक नियमित खाल्ल्याने डोक्याच्या स्काल्पवरील नैसर्गिक तेल म्हणजेच सीबम तयार होण्यास मदत होते. ज्यामुळे केस कोरडे पडत नाहीत.
पालकमध्ये असलेले व्हिटॅमिन सी हे शरीरातील कोलेजन वाढवते, ज्यामुळे केसांची लवचिकता टिकून राहते आणि केस तुटत देखील नाही.
पालकमध्ये फोलेट आणि मॅग्नेशियम हे घटक केसांच्या पेशींच्या पुनरुज्जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
पालकसोबतच आपण आहारात सोयाबिन देखील खायला हवे. सोयाबिनमध्ये प्रथिने भरपूर असतात. ज्यामुळे केसांची घनता अधिक वाढते.