मेहेंदी लावली की केस लाल-तांबडे दिसतात? ५ सोपे उपाय, केस दिसतील सुंदर कलर केल्यासारखे...

Updated:May 6, 2025 14:37 IST2025-05-06T13:48:42+5:302025-05-06T14:37:08+5:30

Hair Care Tips How To Reduce Mehndi Color From Hair Naturally Check Process : Simple Ways to Remove Henna Dye from Hair : How to Remove Henna Naturally and SAFELY : केसांवरील मेहेंदीचा लालभडकपणा कमी करण्यासाठी खास घरगुती उपाय...

मेहेंदी लावली की केस लाल-तांबडे दिसतात? ५ सोपे उपाय, केस दिसतील सुंदर कलर केल्यासारखे...

पांढरे केस काळे करण्यासाठी अनेकजणी केसांना मेहेंदी लावतात. मेहेंदीमुळे (Hair Care Tips How To Reduce Mehndi Color From Hair Naturally) पांढऱ्या केसांना छान रंग येऊन ते रंगवले जातात. परंतु काहीवेळा या मेहेंदीचा रंग केसांवर इतका चढतो की केस अगदी लालभडक दिसू लागतात. केसांवर मेहेंदीचा रंग प्रमाणाच्या बाहेर दिसू लागला की आपला लूक खराब होतो.

मेहेंदी लावली की केस लाल-तांबडे दिसतात? ५ सोपे उपाय, केस दिसतील सुंदर कलर केल्यासारखे...

केसांवरील मेहेंदीच्या लालभडक रंगाने केस इतके रंगून जातात की, त्यांचा नैसर्गिक रंग (Simple Ways to Remove Henna Dye from Hair) जाऊन मेहेंदीचा कृत्रिम रंग येतो. मेहेंदीचा हा रंग केसांवर काही दिवस राहतो मग केस पुन्हा पहिल्यासारखेच दिसू लागतात.

मेहेंदी लावली की केस लाल-तांबडे दिसतात? ५ सोपे उपाय, केस दिसतील सुंदर कलर केल्यासारखे...

परंतु केसांवरील मेहेंदीच्या लालभडक रंगामुळे केसांचे सौंदर्य हरवून जाते. यासाठी केसांवरील मेहेंदीचा लालभडकपणा कमी करण्यासाठी काही खास घरगुती उपाय पाहूयात.

मेहेंदी लावली की केस लाल-तांबडे दिसतात? ५ सोपे उपाय, केस दिसतील सुंदर कलर केल्यासारखे...

केसांवरील मेहेंदीचा लालभडक रंग कमी करण्यासाठी दही आणि बेकिंग पावडर फायदेशीर ठरते. यासाठी एका बाऊलमध्ये, दही आणि बेकिंग सोडा समप्रमाणांत घेऊन त्यांची एकत्रित पेस्ट करावी. ही पेस्ट केसांवर लावून ४० मिनिटे तशीच ठेवावी. त्यानंतर केस शाम्पूने धुवून स्वच्छ करावेत. या उपायांमुळे केसांवरील मेहेंदीचा लालभडक रंग कमी होण्यास मदत होईल.

मेहेंदी लावली की केस लाल-तांबडे दिसतात? ५ सोपे उपाय, केस दिसतील सुंदर कलर केल्यासारखे...

लिंबाचा रस आणि मध यांच्या एकत्रित मिश्रणाने देखील केसांवरील मेहेंदीचा गडद लालभडक रंग कमी करता येतो. यासाठी, एका बाऊलमध्ये लिंबाचा रस आणि मध घ्यावे. यांच्या मिश्रणाची पेस्ट तयार करून ती केसांवर लावून घ्यावी. केसांवर हे तयार मिश्रण लावून हलकेच मसाज करावा. तासभर केस तसेच बांधून ठेवावेत, त्यानंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवून घ्यावेत.

मेहेंदी लावली की केस लाल-तांबडे दिसतात? ५ सोपे उपाय, केस दिसतील सुंदर कलर केल्यासारखे...

सगळ्यांतआधी अंड फोडून त्यातील पिवळा भाग वेगळा काढून घ्यावा. अंडयाच्या पांढऱ्या पारदर्शक भागात थोडे ऑलिव्ह ऑईल मिक्स करून घ्यावे. आता हे तयार मिश्रण केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत लावून हलक्या हाताने मसाज करावा. या उपायांमुळे केसांवरील मेहेंदीचा गडद रंग हलका होण्यास मदत होते, इतकेच नाही तर अंड आणि ऑलिव्ह ऑइल मधील पोषक तत्व देखील केसांच्या वाढीसाठी महत्वाची असतात.

मेहेंदी लावली की केस लाल-तांबडे दिसतात? ५ सोपे उपाय, केस दिसतील सुंदर कलर केल्यासारखे...

केसांवरील मेहेंदीचा रंग काढण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरतो. यासाठी लिंबाचा रस बोटांच्या मदतीने केसांवर लावून घ्यावा. त्यानंतर केसांवर ३० मिनिटे लिंबाचा रस असाच लावून ठेवावा. मग शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. हा उपाय आठवड्यातून ३ दिवस केल्याने केसांवरील मेहेंदीचा रंग गडद रंग कमी करता येतो.

मेहेंदी लावली की केस लाल-तांबडे दिसतात? ५ सोपे उपाय, केस दिसतील सुंदर कलर केल्यासारखे...

ऑर्गन ऑईल, ऑलिव्ह ऑईल आणि खोबरेल तेल यांचे मिश्रण तयार करून घ्यावे. या तेलाने केसांची मालिश करून घ्यावी. यामुळे केसांवरील मेहेंदीचा गडद रंग कमी होण्यास मदत मिळते.