केसांसाठी बहुगुणी आहे मेथी! 'या' पद्धतीने लावा हेअर पॅक, कोंड्याचा त्रास होईल कमी- केस होतील दाट

Updated:June 24, 2025 18:36 IST2025-06-24T18:32:19+5:302025-06-24T18:36:48+5:30

dandruff solution at home: ayurvedic hair pack for scalp health: homemade hair mask for hair fall: केसांसाठी काही घरगुती उपाय करायचे असतील तर मेथी दाणे हे फायदेशीर ठरतात.

केसांसाठी बहुगुणी आहे मेथी! 'या' पद्धतीने लावा हेअर पॅक, कोंड्याचा त्रास होईल कमी- केस होतील दाट

केस गळण्याची समस्या ही सामान्य असली तर प्रदूषण, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, ताणतणाव आणि रासायनिक केसांच्या उत्पादनांमुळे केस कमकुवत होतात आणि तुटू लागतात. अशावेळी काही नैसर्गिक उपाय करणे जास्त गरजेचे आहे. (Hair care tips)

केसांसाठी बहुगुणी आहे मेथी! 'या' पद्धतीने लावा हेअर पॅक, कोंड्याचा त्रास होईल कमी- केस होतील दाट

केसांसाठी काही घरगुती उपाय करायचे असतील तर मेथी दाणे हे फायदेशीर ठरतात. यामुळे केस गळणे कमी होते इतकेच नाही तर केस मजबूत आणि जाड देखील होतात. तसेच केस तुटण्यापासून रोखले जातात. (ayurvedic hair pack for scalp health)

केसांसाठी बहुगुणी आहे मेथी! 'या' पद्धतीने लावा हेअर पॅक, कोंड्याचा त्रास होईल कमी- केस होतील दाट

मेथीमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक अॅसिड असते, जे मुळांना पोषण देऊन केसांच्या वाढीस मदत करते. बुरशीविरोधी गुणधर्म असतात, जे टाळूचे संक्रमण आणि डोक्यातील कोंडा दूर करतात.

केसांसाठी बहुगुणी आहे मेथी! 'या' पद्धतीने लावा हेअर पॅक, कोंड्याचा त्रास होईल कमी- केस होतील दाट

मेथी दाण्याचा फेस पॅक तयार करण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी बारीक पेस्ट करुन ती टाळूला आणि केसांना लावा. ३० ते ४० मिनिटांनी सौम्य शाम्पूने केस धुवा.

केसांसाठी बहुगुणी आहे मेथी! 'या' पद्धतीने लावा हेअर पॅक, कोंड्याचा त्रास होईल कमी- केस होतील दाट

केसांना मेथी दाण्याची पेस्ट आणि दही घालून हेअर मास्क तयार करा. तो टाळूवर आणि केसांना लावा. ३० मिनिटांनी केस धुवा. यात असणारे लॅक्टिक अॅसिड केसांना मऊ आणि चमकदार बनवते.

केसांसाठी बहुगुणी आहे मेथी! 'या' पद्धतीने लावा हेअर पॅक, कोंड्याचा त्रास होईल कमी- केस होतील दाट

नारळाच्या तेलात मेथीचे दाणे गरम करुन केसांना या तेलाने मालिश करा. १ तासानंतर केस धूवा. यामुळे केसांना कंडिशनिंग मिळते.

केसांसाठी बहुगुणी आहे मेथी! 'या' पद्धतीने लावा हेअर पॅक, कोंड्याचा त्रास होईल कमी- केस होतील दाट

मेथीच्या पावडर मध्ये मध मिसळून त्याची पेस्ट तयार करा. केसांना ही पेस्ट २० ते २५ मिनिटे लावा त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. आठवड्यातून १ ते २ वेळा हा उपाय केल्यास फरक जाणवेल.