Join us   

गौरी-गणपतीसाठी-हळदीकुंकवाला जाताना करा सुंदर देखण्या आणि चटकन करता येतील अशा हेअरस्टाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2023 11:10 AM

1 / 8
गौरी-गणपती हा वर्षातील मोठा सण असल्याने या काळात आपण मस्त सजतो. साडी, मेकअप, दागिने हे तर ओघाने आलेच पण हेअरस्टाईल काय करावी हे अनेकदा आपल्याला समजत नाही.
2 / 8
मेसी बन हा गेल्या काही वर्षांपासून ट्रेंडींग असणारा एक खास प्रकार. मेसी असला तरी हा बन साडी किंवा ड्रेसवरही अतिशय खुलून दिसतो. आपले केस लहान असतील तर बाजारात अशा प्रकारचे बन विकत मिळतात.
3 / 8
कोणत्याही प्रकारचा साईड बन किंवा फ्रेंच रोल घालून त्यावर अशाप्रकारच्या आकर्षक अॅक्सेसरीज लावल्यास हेअरलस्टाइल नकळत खुलून येण्यास मदत होते.
4 / 8
वेणी पुन्हा एकदा फॅशन इन असल्याने सागर वेणी किंवा पाचपेडी वेणी आपण नक्की घालू शकतो.
5 / 8
केस मस्त कुरळे असतील आणि मोकळे सोडायचे असतील तर अशाप्रकारे केसांची मध्यभागी वेणी घालायची आणि खालचे केस छान मोकळे सोडायचे.
6 / 8
पोनी टेल हा अतिशय साधा वाटणारा मात्र कोणत्याही काळात, कोणत्याही कपड्यांवर छान दिसणारा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करु शकता.
7 / 8
मध्यभागी छान बन घालून त्याच्या बाजुने छानसा पारंपरिक गजरा किंवा छानसे डेकोरेटीव्ह काही लावल्यास आपला लूक खुलून यायला मदत होते.
8 / 8
दोन्ही बाजुने मस्त नाजूक वेण्या घालून त्या मध्यभागी टक केल्यास ही हेअरस्टाइल आपल्याला फार छान लूक देऊन जाते.
टॅग्स : ब्यूटी टिप्समेकअप टिप्सगणेशोत्सव