गौरी-गणपतीच्या सणाला नटा पारंपरिक पद्धतीने, पाहा केसात गजरा माळण्याच्या सुंदर जुन्या स्टाइल्स
Updated:August 25, 2025 17:49 IST2025-08-25T16:49:31+5:302025-08-25T17:49:01+5:30
Gajra Hairstyles For Gauri Ganpati : केस मोकळे सोडून किंवा हेअर बन बांधून दोन्ही प्रकारे तुम्ही गजरा माळू शकता. गजरा माळण्याच्या नवीन पद्धती पाहूया.

गौरी गणपतीचा (Gauri Ganpati Special Hairstyle) सण गजऱ्याशिवाय अपूर्ण आहे. केसांमध्ये लावण्याचे ब्रोच, आर्टिफिशियल गजरे कितीही असले तरी गजरा लावण्याचा आनंदच काही वेगळा आहे. घेतली पीन आणि लावला उभा गजरा असं न करता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं गजरा लावू शकता. (Gauri Ganpati Special Hairstyle Gajra Hairstyle)
केस मोकळे सोडून किंवा हेअर बन बांधून दोन्ही प्रकारे तुम्ही गजरा माळू शकता. गजरा माळण्याच्या नवीन पद्धती पाहूया.
मोगऱ्याच्या कळ्यांचा गजरा आणला असेल तर या पद्धतीनं लावता येईल. गजऱ्याच्यामध्ये तुम्ही ब्रोच वगैरे लावू शकता.
मागे बन बांधून गजऱ्यानं तो संपूर्ण बन कव्हर करू शकता.
आजकाल आडवा गजरा लावण्याची फॅशन खूपच दिसते. या पद्धतीनं आडवा गजरा लावल्यास तुम्हाला मॉडर्न तितकाच ट्रेडीशनल लूक मिळेल.
मागे बन, पुढच्या केसांना कर्ल्स करून तुम्ही सुंदर मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळू शकता.
वेणी घालून वेणीभोवती गजरा गुंडाळू शकता. किंवा डबल गजरा आडवा लावला तरी केसांचे सौंदर्य वाढेल.
गजरा निवडताना नेहमी फुलांचा ताजेपणा पाहा. ऐनवेळी मोगऱ्याचा गजरा तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे १ दिवस आधीच गजरा घेऊन ठेवा.
गजरा फक्त सौंदर्यं वाढवत नाही तर तुमच्या व्यक्तीमतत्वाला खास स्पर्श देतो.
पूर्ण हेअर बन गजऱ्यानं कव्हर केला तरीही खूप सुंदर लूक येतो. साहावारी किंवा नववारी साडीवर तुम्ही बनची हेअर स्टाईल करू शकता.