Different Ways of Applying Sindoor : कसा आहे तुमचा सिंदूर लूक? ग्लॅमरस-स्मार्ट आणि तरीही पारंपरिक लूक हवा, पाहा फोटो
Updated:April 28, 2022 17:53 IST2022-04-28T17:43:40+5:302022-04-28T17:53:04+5:30
Different Ways of Applying Sindoor : सौभाग्याचे प्रतिक असलेला सिंदूर लावून तुम्हीही दिसा स्टायलिश, पाहा सिंदूर लावण्याचे एक से एक प्रकार...

सिंदूर म्हणजे सौभाग्याचे प्रतिक. सिंदूर लावणे ही सध्या तरुणींमधील फॅशन असून मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या यांच्याबरोबरच सिंदूर लावण्याला तितकेच महत्त्व दिले जाते. फॅशन म्हणूनही नवीन लग्न झालेल्या तरुणी आवर्जून सिंदूर लावतात (Different Ways of Applying Sindoor).
बाजारात लिक्विड सिंदूर, पावडर स्वरुपातला सिंदूर मिळतो. लाल रंगातही वेगवेगळ्या शेडसमधला सिंदूर असल्याने तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे शेडची निवड करु शकता. आपणही रोज सिंदूर लावत नसलो तरी एखाद्या सण-समारंभाला हा सिंदूर आपल्या लूकमध्ये नक्कीच भर घालू शकतो.
लग्नसोहळ्यात सिंदूर लावण्याचा एक विधी तर असतोच पण अभिनेत्रींमध्ये तर लग्न झाल्यावर सिंदूर लावण्याची विशेष फॅशन असल्याचे दिसते. ग्लॅमरस आणि तरीही पारंपरिकतेची जोड असलेला हा सिंदूर लावण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या कोणत्या हे आपण आज समजून घेणार आहोत.
एक बारीक लाईन सिंदूर लावण्याची पद्धत आहे. हा सिंदूर भांगाच्या थोडा पुढच्या बाजूला अतिशय बारीक रेघेच्या स्वरुपात लावला जातो. यासाठी साधारणपणे लिक्विड सिंदूर वापरला जातो. नव्याने लग्न झालेल्या अनेक अभिनेत्री सध्या अशाप्रकारचा सिंदूर लावलेल्या दिसतात. हा सिंदूर भांगाच्या मध्यभागी असला तरी तो कपाळावर लावलेला असतो.
कुंकवाप्रमाणे भांगाच्या मध्यभागी गोलाकार सिंदूर लावण्याची पद्धत आहे. ही पद्धत आता काही प्रमाणात जुनी झाली असली तरी फॅशन म्हणून आजही अनेक जणी अशाप्रकारे सिंदूर लावताना दिसतात.
बंगाल किंवा उत्तरेकडे पूर्ण भांग भरुन सिंदूर लावायची पद्धत आहे. यासाठी कुंकू किंवा पावडर स्वरुपातील सिंदूरचा वापर करतात. त्यामुळे तुमचा पूर्ण भांग लाल रंगाचा दिसतो. ही पद्धत जास्त पारंपरिकतेकडे झुकणारी आहे.
सामान्यपणे सिंदूर ही भांगात भरण्याची पारंपरिक पद्धत असल्याने भांगामध्ये सरळ रेषेत लाल रंगाचा सिंदूर भरला जातो. हल्ली मंगळसूत्र किंवा जोडवी अशी इतर सौभाग्याची आभूषणे न घालता लग्न झालेल्या तरुणी केवळ सिंदूर लावतात. त्याला पुढच्या बाजूने विशिष्ट आकार दिला जातो.