सध्या ट्रेण्डिंग असणाऱ्या चंद्रकोर क्लिपचे सुंदर डिझाईन्स, स्वस्तात मस्त पिना वापरून करा देखणी हेअरस्टाईल
Updated:June 2, 2025 16:36 IST2025-06-02T16:30:35+5:302025-06-02T16:36:04+5:30

सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने पारंपरिक वेशभुषा आणि केशभुषा केलीच जाते. आता पारंपरिक पद्धतीने हेअरस्टाईल करायची असेल तर तुमच्याकडे सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या या चंद्रकोर क्लिप्स असायलाच हव्या..
अशा पद्धतीच्या चंद्रकोर क्लिपा वापरून खूप छान हेअरस्टाईल करता येते.
मोत्यांच्या दागिन्यांसोबत मॅच करायला या मोती लटवलेल्या चंद्रकोर क्लिप छान दिसतील.
अशी ठसठशीत चंद्रकोर क्लिप खोपा पिन म्हणूनही हल्ली वापरली जाते.
ऑनलाईन शॉपिंग साईटवरून किंवा तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारपेठेमधून तुम्ही ही क्लिप घेऊ शकता.
या क्लिपा अगदी स्वस्तात मिळत असून १५ ते २५ रुपयाला एक याप्रमाणेही मिळतात.
लहान मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत सगळ्याच जणींना त्या शोभून दिसणाऱ्या आहेत.
चंद्रकोर क्लिपचं हे एक सुंदर डिझाईन पाहा. सध्या लग्नसराईमुळे या क्लिपांना खूप मागणी आहे.
केसांचा अंबाडा घालून त्याला अधूनमधून या क्लिपा लावून छान सजवता येतं. साधीच हेअरस्टाईल असली तरी खूप उठून दिसेल.