पाहा केसांना खोबरेल तेल लावण्याची योग्य पद्धत, ‘असं’ लावा आणि केस होतील रेशमासारखे मुलायम
Updated:July 17, 2025 15:36 IST2025-07-17T14:20:19+5:302025-07-17T15:36:28+5:30
Coconut Oil for Hair : अधिक फायदे मिळवण्यासाठी केसांना खोबऱ्याचं तेल कसं लावावं हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण पाहणार आहोत.

Coconut Oil for Hair : आंघोळीनंतर केसांना खोबऱ्याचं तेल जवळपास सगळेच लावतात. ही रोजची एक सवयच आहे. वेगवेगळ्या पद्धतीने लोक केसांना खोबऱ्याचं तेल लावतात. पण अधिक फायदे मिळवण्यासाठी केसांना खोबऱ्याचं तेल कसं लावावं हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण पाहणार आहोत.
केसांची खोबऱ्याच्या तेलानं मालिश करणं सगळ्यात चांगली पद्धत मानली जाते. यासाठी तेल कोमट करावं. कोमट तेल केस आणि डोक्याच्या त्वचेवर व्यवस्थित लावावं. त्यानंतर ८ ते १० मिनिटं हळूहळू बोटांनी डोक्याची मालिश करावी. असं केल्यानं डोक्यातील ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि केसांना पुरेसं पोषण मिळतं.
खोबऱ्याच्या तेलानं केस काळे होतात का?
खरं सांगायचं तर केवळ खोबऱ्याचं तेल लावून केस काळे होत नाहीत. पण या तेलानं केसांना पोषण मिळतं. केस हेल्दी आणि मजबूत होतात. जर आपल्याला केस काळे करायचे असतील तर खोबऱ्याच्या तेलात कढीपत्ते, मेथीचे दाणे किंवा आवळा पावडर मिक्स करू शकता. यानं केस काळे होऊ शकतात.
तेलात काय मिक्स करून केसांना लावावं?
खोबऱ्याच्या तेलात वेगवेगळ्या गोष्टी मिक्स करून केसांना लावता येतात. खोबऱ्याच्या तेलात दही, कोरफड, कढीपत्ते, शिकेकाई पावडर, आवळा पावडर, मेथीचे दाणे मिक्स करून लावू शकता. असं केल्यास केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. केस आणखी मजबूत आणि हेल्दी होतात.
केसांची वाढ कशी कराल?
केसांची वाढ करण्यासाठी खोबऱ्याचं तेल खूप फायदेशीर ठरतं. खोबऱ्याचं तेल हलकं कोमट करून केसांना लावा. १० ते १५ मिनिटं केसांची चांगली मालिश करा. रात्रभर केसांना खोबऱ्याचं तेल लावून ठेवा. सकाळी माइल्ड शाम्पूनं केस धुवा. नियमितपणे हा उपाय केला तर केसांची वाढ होऊ शकते.
केसांवर कधी लावावं हे तेल?
केसांना खोबऱ्याचं तेल लावण्याची सगळ्यात योग्य वेळ रात्रीची असते. जर रात्री केसांना खोबऱ्याचं तेल लावाल तर केसांना पुरेसं पोषण मिळतं. डोक्याची त्वचाही हेल्दी होते. आठवड्यातून १ किंवा २ वेळा हे तेल केसांना लावू शकता. या तेलानं केस लांब आणि मजबूत होतात. केसगळतीची समस्याही दूर होते.