कोरड्या-खराट्यासारख्या केसांवर जादू करेल 'हा' हेअर मास्क, केस होतील मऊ, सुळसुळीत आणि काळेभोर

Updated:August 5, 2025 18:32 IST2025-08-05T18:28:28+5:302025-08-05T18:32:01+5:30

Soft shiny hair solution : Frizzy hair treatment: केसांना मऊ- रेशमी करायचे असेल तर स्वयंपाकघरात आढळणाऱ्या ५ पैकी १ पदार्थ आठवड्यातून एकदा लावल्यास फायदा होईल.

कोरड्या-खराट्यासारख्या केसांवर जादू करेल 'हा' हेअर मास्क, केस होतील मऊ, सुळसुळीत आणि काळेभोर

सध्या केसगळतीच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. वाढते प्रदूषण, धूळ आणि बदलत्या हवामानाचा केसांवर परिणाम होतो. केसांची काळजी घेण्यासाठी आपण अनेक महागडे उत्पादने आणि तेलाचा वापर करतो. पण काही केल्या केसांचा कोरडेपणा कमी होत नाही. (Soft shiny hair solution)

कोरड्या-खराट्यासारख्या केसांवर जादू करेल 'हा' हेअर मास्क, केस होतील मऊ, सुळसुळीत आणि काळेभोर

केसांना मऊ- रेशमी करायचे असेल तर स्वयंपाकघरात आढळणाऱ्या ५ पैकी १ पदार्थ आठवड्यातून एकदा लावल्यास फायदा होईल. जाणून घेऊया याबद्दल. (Frizzy hair treatment)

कोरड्या-खराट्यासारख्या केसांवर जादू करेल 'हा' हेअर मास्क, केस होतील मऊ, सुळसुळीत आणि काळेभोर

केसगळती थांबवायची असेल तर कढीपत्ता आणि नारळाच्या तेलाचा मास्क आपण वापरु शकतो. हे त्वचेला आतून पोषण देते आणि केसांची योग्य पद्धतीने वाढ होण्यास मदत करते. कोमट तेलात कढीपत्ता मिसळा आणि केसांना लावा, १ तासाने केस धुवा.

कोरड्या-खराट्यासारख्या केसांवर जादू करेल 'हा' हेअर मास्क, केस होतील मऊ, सुळसुळीत आणि काळेभोर

केस खूप कोरडे रुक्ष झाले असतील तर २ चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी याची पेस्ट करुन ३ चमचे दही मिसळा. हे केसांवर ३० मिनिटे ठेवा, नंतर केस धुवा.

कोरड्या-खराट्यासारख्या केसांवर जादू करेल 'हा' हेअर मास्क, केस होतील मऊ, सुळसुळीत आणि काळेभोर

आपले केस सतत पांढरे होत असतील किंवा विरळ झाले असतील तर १ चमचा आवळा पावडर, १ चमचा ब्राह्मी पावडर, पाणी किंवा कोडफरीचा गर घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मुळापासून टोकापर्यंत लावा. ४५ मिनिटानंतर केस धुवा. आठवड्यातून एकदा असं केल्याने फरक जाणवेल.

कोरड्या-खराट्यासारख्या केसांवर जादू करेल 'हा' हेअर मास्क, केस होतील मऊ, सुळसुळीत आणि काळेभोर

जास्वंदीच्या पाकळ्या आणि ३ चमचे दही घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाळूवर लावा. ३० मिनिटानंतर केस धुवा. ज्यामुळे केस मऊ होण्यास मदत होईल.

कोरड्या-खराट्यासारख्या केसांवर जादू करेल 'हा' हेअर मास्क, केस होतील मऊ, सुळसुळीत आणि काळेभोर

कलोंजीच्या बिया केसांची वाढ होण्यासाठी फायदेशीर आहेत. १ चमचा कलोंजी आणि २ चमचे कोरफडीचा गर घालून पेस्ट करा. ही पेस्ट टाळूला लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवा. यामुळे केसांच गळणं थांबेल.