डोक्यातला कोंडा कमी करणारे ५ सोपे घरगुती उपाय, कोंडा होईल गायब- केस वाढतील भराभर

Updated:December 29, 2024 09:15 IST2024-12-29T09:12:33+5:302024-12-29T09:15:01+5:30

डोक्यातला कोंडा कमी करणारे ५ सोपे घरगुती उपाय, कोंडा होईल गायब- केस वाढतील भराभर

केसांमधला कोंडा कमी करणारे काही सोपे घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच उपयोगी पडू शकतात.(best home remedies for reducing dandruff)

डोक्यातला कोंडा कमी करणारे ५ सोपे घरगुती उपाय, कोंडा होईल गायब- केस वाढतील भराभर

डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडीओ drsaleem4u या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये सांगितलेले उपाय पाहा..(how to get rid of dandruff?)

डोक्यातला कोंडा कमी करणारे ५ सोपे घरगुती उपाय, कोंडा होईल गायब- केस वाढतील भराभर

एक कप पाणी घ्या. त्यामध्ये एक ते दोन टेबलस्पून मेथ्या भिजत घाला. दुसऱ्यादिवशी सकाळी मेथ्या मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावा आणि अर्ध्या तासाने केस धुवून टाका.

डोक्यातला कोंडा कमी करणारे ५ सोपे घरगुती उपाय, कोंडा होईल गायब- केस वाढतील भराभर

पाणी आणि ॲपल साईड व्हिनेगर सम प्रमाणात घेऊन गरम करा. ते कोमट झाल्यानंतर केसांच्या मुळाशी लावा आणि अर्ध्या तासाने केस धुवून टाका.

डोक्यातला कोंडा कमी करणारे ५ सोपे घरगुती उपाय, कोंडा होईल गायब- केस वाढतील भराभर

लिंबाचा रस आणि खोबरेल तेल एकत्र करून केसांच्या मुळाशी लावा आणि अर्ध्या तासाने केस धुवून टाका.

डोक्यातला कोंडा कमी करणारे ५ सोपे घरगुती उपाय, कोंडा होईल गायब- केस वाढतील भराभर

लिंबू आणि दही एकत्र करून डोक्याला लावल्यास कोंडा बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

डोक्यातला कोंडा कमी करणारे ५ सोपे घरगुती उपाय, कोंडा होईल गायब- केस वाढतील भराभर

कडुलिंबाची पाने पाण्यात घालून उकळून घ्या आणि त्या पाण्याने केस धुवा. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास डोक्यातला कोंडा निश्चित कमी होईल.